मागील काही दिवसांपूर्वी अहमदनगरच्या नामांतराचा मुद्दा चांगलाच गाजला होता. या शहराचे नाव अहिल्यानगर करा अशी मागणी केली जात आहे. असे असतानाच आता पुण्याचे नाव बादलण्याची मागणी जोर धरू लागली आहे. राष्ट्रवादीचे नेते तथा आमदार अमोल मिटकरी यांनी पुणे शहराचे नाव जिजाऊ नगर करावे, अशी मागणी केली आहे. तर या नावास हिंदू महासंघाने विरोध केला आहे. त्यामुळे पुणे शहर नामांतराच्या मुद्द्यावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा >>>Swami Vivekananda and Narendra Modi : नरेंद्र मोदी हा तर स्वामी विवेकानंदांचा पुनर्जन्म; भाजपा खासदार सौमित्र खान यांच्या विधानावरून वाद

Congress Leader Mukul Wasnik, akola lok sabha seat, Mukul Wasnik Criticizes Modi Government, Alleges Anarchy in the country, BJP in power, lok sabha 2024, election campagin, akola news,
“भाजपच्या सत्तेत देशात अराजकता,” काँग्रेस नेते मुकुल वासनिक यांची घणाघाती टीका; म्हणाले, “पराभव दिसत असल्याने…”
BJP tension rises in Karnataka Lingayat saints
कर्नाटकात भाजपाचे टेन्शन वाढले; मोदी सरकारमधील मंत्र्यांविरोधात लिंगायत संत लढणार
Sanjay Nirupam
“संजय राऊतांनी शिवसेना, राष्ट्रवादी संपवली, आता…”, काँग्रेसमधील नेत्याचं मोठं विधान
nitin gadkari
भाजपा ३७० जागा कशा जिंकणार? नितीन गडकरींनी मांडलं लोकसभेचं गणित; म्हणाले, “आमच्या संघटनेने…”

अमोल मिटकरी यांनी काय मागणी केली?

राष्ट्रवादीचे नेते तथा आमदार अमोल मिटकरी यांनी पुणे शहराला जिजाऊ नगर असे नाव द्यावे, अशी मागणी केली आहे. त्यांनी याबाबत एक ट्वीटही केले आहे. “पुणे शहराचे नामकरण “जिजाऊ नगर” व्हावे ही महाराष्ट्रातील तमाम शिवभक्तांची इच्छा आहे. येणाऱ्या अधिवेशनात याबाबत सरकारकडे मागणी करणार,” असे अमोल मिटकरी आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले आहेत.

हेही वाचा >>> Sinnar Shirdi Accident : मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत, मुख्यमंत्र्यांनी दिले अपघाताच्या चौकशीचे आदेश!

हिंदू महासंघाचा नामांतरास विरोध

तर पुणे शहराचे नाव जिजाऊ नगर करण्यास हिंदू महासंघाने विरोध केले आहे. “जिजाऊमाता देशातील सर्व हिंदुत्ववाद्यांना आणि शिवभक्तांना वंदणीय आहेत. मात्र पुणे शहराला त्यांचे नाव देणे उचित होणार नाही, असे आमचे मत आहे. स्वत: छत्रपती शिवाजी महाराज यांनीदेखील या शहराचे नाव बदलले नव्हते. त्याऐवजी राजमाता जिजाऊ यांचे लाल महाल येथे स्मारक उभारण्यात यावे. हिंदू महासंघाची ही जुनीच मागणी आहे,” अशी भूमिका हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी घेतली आहे.