पुणे : देशात आणि विशेषत: राज्यात विशिष्ट सामाजिक वातावरण तयार होत आहे. या पार्श्वभूमीवर नव्या पिढीत वैचारिक स्पष्टता येण्यासाठी फुले दाम्पत्याचे काम आदर्श ठरेल. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाणे गरजेचे आहे,’ असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी येथे व्यक्त केले.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून आयोजित ‘सावित्रीबाई, जोतिबांचे शिक्षक मिचेल दाम्पत्य आणि स्त्री शिक्षणातील पूर्वसूरी’ या कामिल पारखेलिखित पुस्तकाचे प्रकाशन पवार यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ट्रस्टचे अध्यक्ष गणेश चिंचोले, सचिव दीपक गिरमे, राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे, माजी आमदार जयदेव गायकवाड, ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे, चेतक बुक्सचे मदन हजेरी या वेळी उपस्थित होते.

पवार म्हणाले, ‘शिक्षणाचा विस्तार हा इंग्रजांच्या धोरणाचा भाग होता. त्यानुसार इंग्रजांनी संस्थात्मक उभारणी केली. त्यामध्ये मिशन केंद्र उभे करून शिक्षण दिले जात होते. सामान्य कुटुंबातील मुला-मुलींना त्याचा लाभ होत होता. महात्मा फुले यांना शिक्षणासाठी याचा फायदा घेता आला. फुले यांचे विचार समाजापर्यंत पोहोचले आहेत. मात्र, अजूनही काम करण्याची गरज आहे.’

‘महात्मा फुले हे बांधकाम क्षेत्रामध्ये होते. खडकवासला धरणाच्या पायाभूत कामात त्यांचा सहभाग होता. कात्रजच्या बोगद्याचे काम त्यांच्या कंपनीने केले. या क्षेत्रातील आगळेवेगळे कठीण काम साधनसामग्री नसताना त्यांनी केले,’ असे पवार म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘स्वातंत्र्याच्या अगोदर राणी आणि पंचम जॉर्ज भारतात आले असताना महात्मा फुले यांनी त्यांना निवेदन दिले. दुष्काळ असल्याने खडी फोडण्याची शिक्षा देऊ नका. तलाव बांधण्याचे काम दिले, तर दुष्काळातून सुटका होईल. विलायतेतून चांगले बियाणे उपलब्ध करून द्या. केवळ शेतीमधून आर्थिक प्रश्न सुटत नाही, तर संकरित गाय पाठवून दुधाचा जोड व्यवसाय करता येईल, अशा मागण्या फुले यांनी त्यामध्ये केल्या होत्या,’ असे पवार यांनी सांगितले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल माने यांनी, तर जॅकलीन पारखे यांनी आभार