scorecardresearch

Premium

“सत्ता येते अन् जाते, पण…”, आंबेगावातून शरद पवारांचा वळसे-पाटलांना सूचक इशारा

पक्ष फुटीनंतर शरद पवार हे पहिल्यांदाच आंबेगाव तालुक्यात आले होते.

dilip walase patil sharad pawar
दिलीप वळसे-पाटलांनी शरद पवारांची भेट घेतली ( संग्रहित छायाचित्र )

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार रविवारी, १ ऑक्टोबर जुन्नर तालुक्याच्या दौऱ्यावर होते. जुन्नर तालुक्यातील आदिवासी मेळाव्याला त्यांनी हजेरी लावली होती. जुन्नरवरून शरद पवार यांनी आपली गाडी थेट एकेकाळच्या सगळ्यात विश्वासू सहकारी असलेल्या मंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या आंबेगाव मतदारसंघात वळवली. यावेळी वळसे-पाटील यांच्या समर्थकांनी शरद पवार यांचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं.

दिलीप वळसे-पाटील यांनी अजित पवार यांच्या गटाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शरद पवार आणि वळसे-पाटील यांच्या कुटुंबात दुरावा निर्माण झाला आहे. पक्ष फुटीनंतर शरद पवार हे पहिल्यांदाच आंबेगाव तालुक्यात आले होते. कार्यकर्त्यांच्या आग्रहाला मान देऊन शरद पवार आंबेगाव तालुक्यात आले. यावेळी शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केलं.

revenue minister radhakrishna vikhe patil, inspects damaged crops
“शेतकऱ्यांना भरीव मदत दिली जाईल”, महसूलमंत्री विखे पाटील यांची ग्वाही; नुकसानग्रस्त पिकांची पाहणी
Three children drowned Ganesh Visarjan bamni nanded
नांदेड: गणेश विसर्जनादरम्यान बिलोलीत तीन मुलांचा बुडून मृत्यू
jalgaon district heavy rain, heavy rainfall in jalgaon, flood in jalgaon
जळगाव जिल्ह्यात मुसळधार; अनेक नदी, नाल्यांना पूर, घरांची पडझड
Yellow mosaic Chandrapur
सोयाबीनवर पिवळा मोझॅकचे आक्रमण, चंद्रपूर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज जाहीर करा; पालकमंत्री मुनगंटीवार यांची मागणी

“आंबेगाव तालुक्यात एक जाहीर सभा घेणार”

शरद पवार म्हणाले, “अनेकांचा आग्रह होता की आंबेगाव तालुक्यात येऊन जावं. राज्याच्या राजकारणात काही बदल झालेत. सत्ता येते आणि जाते, पण सत्तेला चिकटून राहायचं नाही. चिकटून राहण्याची भूमिका घेतल्यानंतर लोक कधी ना कधीतरी कायमचा निकाल दिल्याशिवाय राहत नाही. आंबेगाव तालुक्यात एक जाहीर सभा घ्यावी हा आग्रह याची पूर्तता लवकरच करेन.”

“कुणी वेगळी भूमिका घेतली असेल तर…”

दरम्यान, जुन्नरमध्ये शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. तेव्हा शरद पवार यांनी म्हटलं, “महाराष्ट्रात आणि बाहेर सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा संस्थापक कोण, ते सर्वांना ठाऊक आहे. त्यामुळे लोकांची भावना ही अनुकूल आहे, असं आमचे लोक सांगतात, त्यात तथ्य आहे. कुणी वेगळी भूमिका घेतली असेल, तर तो त्यांचा लोकशाहीमधील अधिकार आहे. त्यावर मी भाष्य करू इच्छित नाही.”

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ncp leader sharad pawar in dilip walase patil ambegaon taluka manchar ssa

First published on: 02-10-2023 at 08:15 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×