राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार रविवारी, १ ऑक्टोबर जुन्नर तालुक्याच्या दौऱ्यावर होते. जुन्नर तालुक्यातील आदिवासी मेळाव्याला त्यांनी हजेरी लावली होती. जुन्नरवरून शरद पवार यांनी आपली गाडी थेट एकेकाळच्या सगळ्यात विश्वासू सहकारी असलेल्या मंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या आंबेगाव मतदारसंघात वळवली. यावेळी वळसे-पाटील यांच्या समर्थकांनी शरद पवार यांचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं.
दिलीप वळसे-पाटील यांनी अजित पवार
“आंबेगाव तालुक्यात एक जाहीर सभा घेणार”
शरद पवार म्हणाले, “अनेकांचा आग्रह होता की आंबेगाव तालुक्यात येऊन जावं. राज्याच्या राजकारणात काही बदल झालेत. सत्ता येते आणि जाते, पण सत्तेला चिकटून राहायचं नाही. चिकटून राहण्याची भूमिका घेतल्यानंतर लोक कधी ना कधीतरी कायमचा निकाल दिल्याशिवाय राहत नाही. आंबेगाव तालुक्यात एक जाहीर सभा घ्यावी हा आग्रह याची पूर्तता लवकरच करेन.”
“कुणी वेगळी भूमिका घेतली असेल तर…”
दरम्यान, जुन्नरमध्ये शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. तेव्हा शरद पवार यांनी म्हटलं, “महाराष्ट्रात आणि बाहेर सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp leader sharad pawar in dilip walase patil ambegaon taluka manchar ssa