पिंपरी : तीन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर राष्ट्रवादीला (अजित पवार) पिंपरी-चिंचवडमध्ये शहराध्यक्ष मिळणार आहे. विधानपरिषदेची आमदारकी मिळावी यासाठी इच्छुक असलेले माजी महापौर, माजी शहराध्यक्ष योगेश बहल यांच्याकडेच पुन्हा शहराध्यक्षपदाची धुरा सोपविण्याचे निश्चित झाले आहे. लवकरच अधिकृत घोषणा केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

चिंचवड विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीला (अजित पवार) न मिळाल्यास महाविकास आघाडीत जाण्याचा माजी नगरसेवकांनी दिलेला इशारा, शहराध्यक्ष नियुक्त केला जात नसल्याने व्यक्त केलेली नाराजी,  माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांनी निवडणूक लढविण्याचा निर्धार करत सोडलेले टीकेचे बाण, माजी नगरसेवकांनी जेष्ठ नेते शरद पवार यांची घेतलेली भेट या सर्व राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवडमधील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना बारामतीत बोलावून घेतले. चिंचवड आणि पिंपरीतील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. भोसरीतून विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्या अजित गव्हाणे यांनी १६ जुलै २०२४ रोजी राष्ट्रवादीच्या (अजित पवार) शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिला. माजी नगरसेवकांसह राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षात प्रवेश केला. तीन महिने होत आले आणि विधानसभा निवडणूक तोंडावर असतानाही शहराध्यक्ष नियुक्त केला जात नसल्याने पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.

congress mp abhishek manu singhvi remarks on cji chandrachud
चंद्रचूड यांच्या कार्यकाळात सत्तासंघर्षाचा निकाल लांबणीवर पडणे अतर्क्य ; सिंघवी
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Tuljapur Devanand Rochkari, Tuljapur, Dheeraj Patil,
तुळजापुरात मैत्रीपूर्ण लढत की, आघाडीत बिघाडी? मविआचा अधिकृत उमेदवार कोण? रोचकरी की, पाटील?
Sadabhau Khot allegations
“…तेव्हा माझा एन्काऊंटर करण्याचा डाव होता”, सदाभाऊ खोत यांचा खळबळजनक आरोप!
Amit Shah made special mention of Devendra Fadnavis in speech in shirala
अमित शहांनी फोन काढला आणि थेट फडणवीसांना लावला… म्हणाले, “पुन्हा…”
flying squad, seizes more than 2 crore rupees, maharashtra assembly election 2024
वसई-विरार पालिका परिसरात सलग दुसर्‍या दिवशी पैशांचा पाऊस, दोन कोटींहून अधिक रक्कम जप्त
bombay high court slams bmc officer over cm order
मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला महत्व नाही का? उच्च न्यायालयाची महापालिका प्रशासानाला विचारणा
Nilesh Rane :
Nilesh Rane : ‘माझ्या मागून आलेले आमदार अन् मंत्री झाले, मी अजून…’, निलेश राणेंच्या विधानाची चर्चा

हेही वाचा >>> ‘क’ दर्जाच्या मराठी चित्रपटांनाही आता अनुदान

त्यावर सर्वांनी एकमताने नाव द्यावे दिल्यास मी लगेच जाहीर करतो असे पवार यांनी सांगितले. उपस्थितांनी माजी महापौर योगेश बहल यांचे नाव सुचविले. त्यानंतर तत्काळ पवार यांनी बहल यांच्या नावाची घोषणा केली. लवकरच बहल यांना अधिकृत पत्र दिले जाणार आहे. चिंचवड मधील माजी नगरसेवकांनी चिंचवड विधानसभा मतदारसंघ पक्षाकडे घेण्याची मागणी केली. महायुतीचे जागा वाटप अंतिम झाले नाही. जागा वाटपाच्या बैठकीत चिंचवडवर चर्चा होईल. जागा न मिळाल्यास युतीचा धर्म पाळावा लागेल असे अजित पवार यांनी स्पष्ट केले. दरम्यान, जागा राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाला न मिळाल्यास आम्ही भूमिका जाहीर करू असे माजी नगरसेवक मयूर कलाटे यांनी सांगितले.

हेही वाचा >>> ‘त्या’ बेकायदा गाळ्यांवर वरदहस्त कोणाचा? आयुक्तांनी नेमली चौकशी समिती

अजित पवार यांनी बैठकीत शहराध्यक्षपदी  माझ्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. दोन दिवसात अधिकृत पत्र मिळेल. त्यानंतर सर्वांना विश्वासात घेऊन नवीन कार्यकारिणी तयार केली जाईल, असे योगेश बहल यांनी सांगितले. दरम्यान, शहराध्यक्षपदासाठी माजी महापौर योगेश बहल यांच्यासह पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे,  जगदीश शेट्टी, नाना काटे, भाऊसाहेब भोईर यांची नावे स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सुचविली होती. त्यांपैकी बनसोडे विधानसभा लढणार असून, बहल यांना राज्यपालनियुक्त आमदारकी देण्याची मागणी होती. तर, काटे, भोईर हे चिंचवडमधून निवडणूक लढण्यावर ठाम आहेत. भोईर यांनी तर मेळावा घेत निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे शहराध्यक्षपद निवडीस विलंब होत होता. अखेरीस बहल यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.