राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर त्याचे पडसाद राज्यभर उमटले. पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये देखील नवाब मलिक यांना अटक केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आक्रमक भूमिका घेत केंद्र सरकरच्या विरोधात घोषणाबाजी केली आणि अटकेचा निषेध नोंदवला. ‘गांधी लढे थे गोरो से, हम लढेंगे चोरो से’, ‘केंद्र सरकार जब-जब डरती है, ईडी को आगे करती है’, अशा घोषणा देत राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी भाजपावर हल्लाबोल केला.

मंत्री नवाब मलिक यांना आज (२३ फेब्रुवारी) ईडीने अटक केली. त्यानंतर राजभर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारचा निषेध केला. यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे म्हणाले, “ईडीने केलेली कारवाई बेकायदेशीर आहे. कोणतीही नोटीस न देता ही कारवाई केल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केला. केंद्र सरकार अडचणीत आले की सत्तेचा गैरफायदा करते. मलिकांना ईडीने केलेली ही अटक त्याचंच उदाहरण आहे.”

kolhapur, hatkanangale, BJP, Maharashtra Kranti Sena Party, Constituent Party in mahayuti, Maharashtra Kranti Sena in mahayuti, lok sabha 2024, election 2024,
महाराष्ट्र क्रांती सेना पक्षाला घटक पक्ष म्हणून मान्यता; भाजपकडून मित्र पक्षांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न
Devendra Fadnavis On Praful Patel Statement
“शरद पवार भाजपाबरोबर येण्यास ५० टक्के अनुकूल होते”; प्रफुल्ल पटेलांच्या दाव्यावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले, “हे सत्य…”
25 prominent politicians joined BJP
आधी भ्रष्टाचाराच्या आरोपांनी ‘कलंकित’; भाजपमध्ये येताच ‘चकचकीत’
war Of words between amol kolhe and shivajirao adhalrao patil over shirur lok sabha constituency
शिवाजीराव आढळरावांच्या ‘राष्ट्रवादी’तील प्रवेशानंतर ‘शिरूर’मध्ये आता शब्दिक युद्ध

“महागाई, बेरोजगारीवरून लक्ष हटवण्यासाठी कारवाई”

“देशात महागाई वाढली आहे, बेरोजगारी आहे. यावर तोडगा न काढता सर्वसामान्यांचे लक्ष हटवण्यासाठी ही कारवाई केली जात आहे,” असा आरोप देखील अजित गव्हाणे यांनी केला. पिंपरीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकवटले होते. त्यांनी मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत चौक दणाणून सोडला.

हेही वाचा : “२०१९ मध्ये माझ्यावरही भाजपामध्ये जाण्यासाठी दबावतंत्र वापरले, पण…”, नवाब मलिकांच्या अटकेनंतर जयंत पाटलांचा गंभीर आरोप

पुण्यातील बालगंधर्व रंगमंदीर चौकात देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.