Kasba Peth constituency by election: पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघातील भाजपा आमदार, माजी महापौर मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर या रिक्त जागेवर पोटनिवडणूक लढवण्यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील-ठोंबरेंनी केलेल्या विधानानंतर पक्षाने त्यांना घरचा आहेर दिला आहे. मुक्ता टिळक यांच्यासाठीच २०१९ साली अगदी ऐनवेळी आपलं तिकीट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं कापलं होतं असं सांगताना आपण पोटनिवडणूक लढवण्यासाठी उत्सुक असल्याचं म्हणणाऱ्या रुपाली पाटील-ठोंबरेंना पुणे राष्ट्रवादीने एखाद्या लोकप्रितिनीधीच्या दशक्रियाविधीआधीच त्या मतदारसंघातील पोटनिवडणुकीबद्दल चर्चा करणं हे पुणे शहरातील राजकीय संस्कृतीला शोभणारं नसल्याचं म्हटलं आहे.

रुपाली पाटील ठोंबरे नेमकं काय म्हणाल्या?

गुरुवारी (२२ डिसेंबर २०२२ रोजी) मुक्ता टिळक यांचं निधन झाल्यानंतर सोमवारी पत्रकारांशी संवाद साधाना रुपाली पाटील-ठोंबरेंनी, “कसबा मतदारसंघाच्या आमदार मुक्ताताई यांचं निधन झालं आहे. त्या आजारी होत्या. त्याच्याऐवजी जी पोटनिवडणूक लाढणार आहे त्यामध्ये पक्षाने जर आदेश दिला तर मी ही निवडणूक लढवणार आहे. पण ही पोटनिवडणूक जाहीर झाली पाहिजे. आम्ही तर तयार आहोत पक्षाच्या आदेशासाठी. पक्षाने आदेश दिला तर आम्ही निवडणूक लढवण्यास तयार आहोत,” असं म्हटलं होतं.

Pooja tadas and ramdas tadas
सासऱ्याविरोधात सून! कौटुंबिक अत्याचाराचा आरोप केलेल्या पूजा तडस निवडणुकीच्या रिंगणात, ‘या’ पक्षाने दिली संधी
male candidates Kalyan
कल्याण लोकसभेत ‘ईडी’ची पीडा टाळण्यासाठी ठाकरे गटाच्या पुरुष उमेदवारांची माघार?
ठाण्यासाठी शिंदे गटाच्या जोर-बैठका; मतदारसंघात उमेदवारीसाठी कार्यकर्ते आग्रही ; भाजपाला जागा जाण्याच्या चर्चेने अस्वस्थता
pune ravindra dhangekar marathi news, ravindra dhangekar congress latest news in marathi
पुण्यात काँग्रेसला स्वकियांचाच धोका, केंद्रीय पथक दाखल

बिनविरोध निवडणुकीलाही रुपाली पाटील-ठोंबरेंचा विरोध

ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी असं वाटत नाही का तुम्हाला? असा प्रश्न रुपाली पाटील-ठोंबरेंना विचारण्यात आलेला. त्यावर उत्तर देताना, “मुळात एक लक्षात घ्या २०१९ ला जी निवडणूक झाली त्यामध्ये मुक्ताताई आमदार झाल्या. त्या तेव्हापासून आजारी होत्या. बिचाऱ्या त्यांनी त्या आजारातसुद्धा जेवढं शक्य होतं तेवढं काम केलेलं आहे. त्याआधी गिरीष बापट सर ३० वर्ष आमदार होते. पोटनिवडणूक झाल्यानंतर मतदार ठरवतील ना की कोणाला निवडणूक द्यायचं. असं असतं की पोटनिवडणूक बिनविरोध करावी. पण ही अपेक्षा कोणी करावी ज्यांनी सगळ्याच पोटनिवडणुका बिनविरोध केल्या असतील. पंढरपूर पोटनिवडणूक, मुंबईत जी पोटनिवडणूक झाली त्यावेळेस त्या महिलेला कोणी आणि किती त्रास दिला सगळ्यांनी पाहिलं. जी पोटनिवडणूक लागणार आहे ती अशीच खेळीमेळीत पार पडावी अशी अपेक्षा आहे,” असं रुपाली पाटील ठोंबरेंनी म्हटलं होतं.

नक्की वाचा >> “साहेब सध्याचे मुख्यमंत्री…”; जाहीर कार्यक्रमात पुणेकराने शिंदेंचा केलेला तो उल्लेख ऐकून राज ठाकरेंनीच कपाळाला हात लावला

रुपाली पाटील-ठोंबरेंना घरचा आहेर

रुपाली पाटील-ठोंबरेंबरोबरच भारतीय जनता पार्टीच्या काही नेत्यांनीही या पोटनिवडणुकीबद्दल भाष्य केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहाराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी एक व्हिडीओ जारी करुन आपली भूमिका स्पष्ट केली. जगताप यांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना या पोटनिवडणुकीबद्दल भाष्य करायचं नाही अशी तंबी दिल्याचं सांगितलं. तसेच रुपाली पाटील-ठोंबरे यांचा थेट उल्लेख जगताप यांनी टाळला असला तरी पोटनिवडणुकीबद्दल अशापद्धतीने उतावळेपणे बोलणं शहराच्या राजकीय संस्कृतीला धरुन नसल्याचा टोला लगावला.

मुक्ताताई भाजपाच्या असल्या तरी…

“पुणे हे वैचारिक दृष्ट्या वेगळं शहर म्हणून ओळखलं जातं. या शहरामध्ये चुकीच्या काही राजकीय परंपरा चालू व्हायला नको,” असं जगताप यांनी म्हटलं आहे. तसेच, “मुक्ताताईंचं जाणं हे सर्वच राजकीय पक्षांसाठी वेदनादायक आहे. त्यांच्या जाण्यानंतर त्यांचा अजून दशक्रीयाविधी सुद्धा व्हायचा आहे. मला वाटतं आज चौथा किंवा पाचवा दिवस आहे. अजून दशक्रियाविधीला सुद्धा वेळ आहे. असं असताना काही राजकीय मंडळी पोटनिवडणुकीसंदर्भात चर्चा करायला लागले आहेत. कसबा मतदारसंघातील जागा रिकामी झाली आहे. ती निवडणूक कशी लढवायची, कशाप्रकारे त्या ठिकाणी उमेदवारी द्यायची याबद्दलही चर्चा झाली. अर्थात मुक्ताताईंच्या पक्षातूनही एकाने निवडणूक बिनविरोध व्हावी अशापद्धतीचं मत व्यक्त केलं. माझ्या दृष्टीने या सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत असं वाटतं,” असं जगताप यांनी म्हटलं आहे. तसेच, “मुक्ताताई भाजपाच्या असल्या तरी त्या आमच्या बहिणीसारख्या होत्या,” असंही जगताप म्हणाले.

नक्की वाचा >> “शीशे मे रेहनेवाले घर मे…”; फडणवीसांनी हिंदीमिश्रीत मराठीत केलेल्या ‘त्या’ कमेंटने पिकला एकच हशा! CM शिंदेंनाही हसू अनावर

“मी सर्वांना सक्तीच्या सूचना केल्या…”

“त्यांच्या दशक्रियाविधीच्या आधी त्यांच्या मतदरासंघातील पोटनिवडणुकीची चर्चा होणं हे पुण्याची संस्कृती बिघवडणारं आहे असं मला वाटतं,” असंही जगताप यांनी स्पष्टपणे सांगितलं. तसेच शहराध्यक्ष म्हणून आपण राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना सूचना केल्याचंही जगताप म्हणाले. “मी सर्वांना सक्तीच्या सूचना केल्या आहेत की कसबा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी निवडणूक लढवणार की नाही लढवणार याची चर्चा करणार नाही,” असं जगताप म्हणाले. जगताप यांनी घेतलेली भूमिका ही रुपाली पाटील-ठोंबरेंच्या भूमिकेच्या अगदी विरोधात आहे. त्यामुळे शहराध्यक्षांची भूमिका ही रुपाली पाटील-ठोंबरेंना घरचा आहेर असल्याची चर्चा पुण्यातील राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.