scorecardresearch

मंचावर उपस्थित आयोजकांनी केला वयाचा उल्लेख; शरद पवार नाराजी जाहीर करत म्हणाले, “मी काही म्हातारा…”

“मी क्रीडा क्षेत्रात कधी राजकारण येऊ देत नाही आणि राजकारणात जेव्हा कुस्ती करायची तेव्हा कुस्ती करायची”

NCP, Sharad Pawar, Wrestling Competiton, Pune, Shirur,
"मी क्रीडा क्षेत्रात कधी राजकारण येऊ देत नाही आणि राजकारणात जेव्हा कुस्ती करायची तेव्हा कुस्ती करायची"

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी पुण्यातील शिरुर येथे रामलिंग महाराज यात्रोत्सवात आयोजित राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेच्या बक्षिस वितरण सोहळ्याला उपस्थिती लावली. यावेळी शरद पवारांनी केलेल्या भाषणाची सध्या चांगलीच चर्चा सुरु आहे. व्यासपीठावर उपस्थित आयोजकांनी यावेळी शरद पवारांच्या वयाचा उल्लेख केल्यानंतर त्यांनी आपण अजून म्हातारे झालो नसल्याचं म्हटलं.

व्यासपीठावर बोलताना आयोजकांनी शरद पवारांच्या वयाचा उल्लेख केला होता. यानंतर शरद पवार भाषणासाठी उभे राहिले. यावेळी त्यांनी मी अजून म्हातारा झालो नाही असं मिश्किलपणे म्हटलं. यानंतर उपस्थितांनीही टाळ्या वाजवत शरद पवारांच्या वक्तव्याला दुजोराच दिला.

“मी आयोजकांवर नाराज आहे. माझी त्यांच्यावर नाराजी आहे. आयोजक बोलले की या वयात… मी काही अजून म्हातारा झालेलो नाही,” असं शरद पवार म्हणाले. शरद पवारांनी यावेळी विरोधकांवरही अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. ते म्हणाले की, “कुस्तीगीर परिषदेचा माझा जुना संबंध आहे. मी कुस्तीगीर परिषदेचा अध्यक्ष आहे. नवनवीन पैलवान तयार होत असल्याचा आनंद आहे. राजकारण एका बाजूला आणि क्रीडा क्षेत्र एका बाजूला. मी क्रीडा क्षेत्रात कधी राजकारण येऊ देत नाही आणि राजकारणात जेव्हा कुस्ती करायची तेव्हा कुस्ती करायची”.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ncp sharad pawar comment on his age in wrestling competition shirur pune sgy

ताज्या बातम्या