गेल्या काही दिवसांपासून पुणे-मुंबईसह महाराष्ट्रात कसबा पोटनिवडणुकीची चर्चा चालू आहे. कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांनी ११ हजाराहून जास्त मतांनी भाजपाच्या हेमंत रासने यांचा पराभव केला. त्यामुळे २८ वर्षांपासून भाजपाच्या हातात असणारा हा मतदारसंघ काँग्रेसनं जिंकला आहे. या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून भाजपावर टीका केली जात असताना भाजपाकडूनही त्याला प्रत्युत्तर दिलं आहे. यावर आज पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भूमिका मांडली आहे. तसेच, त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनाही टोला लगावला आहे.

काय म्हणाले शरद पवार?

यावेळी बोलताना शरद पवारांनी आपल्या स्वत:लाच कसबा निवडणूक जिंकण्याची अपेक्षा नव्हती, असं म्हटलं आहे. “तो भाजपाचा गड आहे असं बोललं जात होतं. तिथे अनेक वर्षं गिरीश बापटांनी प्रतिनिधित्व केलं होतं. पुण्यातील बिगर भाजपा वर्गाशी मैत्रीचे संबंध हे बापटांचं वैशिष्ट होतं. त्यामुळे त्यांचं वर्चस्व असलेला मतदारसंघ आपल्याला जड जाईल असा आमचा अंदाज होता. पण शेवटी शेवटी त्यांनी बापटांच्या सल्ल्याने निर्णय घेतले की नाही याची कुजबुज ऐकायला मिळाली. त्यामुळे बापटांना किंवा टिळकांना डावलून घेतलेल्या निर्णयांचा फटका बसेल आणि त्याचा फायदा होईल असा अंदाज होता”, असं शरद पवार म्हणाले.

grape, grape export, America, Europe,
अमेरिका, युरोपला उच्चांकी द्राक्ष निर्यात
heat waves, weather,
यंदाचा एप्रिल महिना उष्णतेच्या लाटांचा; पुढील पाच दिवस पारा आणखी वाढणार
Pune, Father, murder son, pune latest news,
पुणे : वडिलांनी दिली मुलाला मारण्यासाठी ७५ लाखांची सुपारी
Shivajirao Adharao Patil,
‘डॉ. कोल्हे जरा विकासाचेही बोला…’, शिवाजीराव आढळराव-पाटील यांचा टोला

देवेंद्र फडणवीसांचं ‘ते’ विधान

दरम्यान, यावेळी शरद पवारांनी देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्यावर खोचक टोला लगावला. “कसबा पोटनिवडणुकीत मिळवलेला विजय हा काँग्रेस किंवा महाविकास आघाडीचा नसून रवींद्र धंगेकरांचा आहे”, असं विधान देवेंद्र फडणवीसांनी केलं होतं. तसेच, “कसबा किंवा चिंचवड या मतदारसंघात पक्षांमध्ये निवडणूक झाली नसून ती उमेदवारांमध्ये झालेली निवडणूक होती”, असं वक्तव्य भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं होतं. या मुद्द्यावरून शरद पवारांनी देवेंद्र फडणवीसांना प्रत्युत्तर दिलं आहे.

“विदेशात नरेंद्र मोदींनी नेहरू, इंदिराजी, राजीव गांधी..”, ठाकरे गटाचा हल्लाबोल; विरोधकांच्या ‘त्या’ पत्राचा केला उल्लेख!

“ठीक आहे. त्यांचं असेसमेंट असेल. चांगली गोष्ट आहे. किमान त्यांनी ज्यांचा विजय झाला, असे विजय देणारे उमेदवार आमच्या सगळ्यांचे होते हे त्यांनी मान्य केलं. कारण निवडणुकीच्या आधी त्यांची वक्तव्य काय काय होती, हे भाषणात आलं आहे. आता त्यात थोडासा गुणात्मक बदल आहे. किमान निवडून आलेल्या व्यक्तीबद्दल ते चांगलं बोलतायत. चांगली गोष्ट आहे”, असं शरद पवार म्हणाले आहेत.