आळंदी: इंद्रायणी नदीत वाहून जाणाऱ्या तरुणाला वाचवण्यात एनडीआरएफच्या जवानांना यश आल आहे. अमोल राठोड असं तरुणाच नाव असून त्यांनी झाडाच्या मुळाला घट्ट पकडल्याने त्यांचा जीव थोडक्यात बचावला आहे. रात्रीपासून पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. सर्वच नद्या दुथडी भरून वाहत आहेत. अशातच इंद्रायणी नदी देखील दुथडी भरून वाहत आहे.
आळंदीत आज संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. यामुळे अवघ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखोंच्या संख्येने वारकरी आळंदीत दाखल झाले आहेत. अमोल राठोड हा तरुण आज सकाळी इंद्रायणी नदी वाहून गेला, काही अंतरावर गेल्यानंतर त्याने झाडाच्या मुळांना घट्ट पकडलं. याबाबतची माहिती एनडीआरएफ ला मिळतात त्यांनी तात्काळ त्या ठिकाणी जाऊन अमोल यांना बाहेर काढलं.
दैव बलवत्तर असल्याने अमोल ला वेळेत बाहेर काढण्यात आलं. पुढील उपचारासाठी आळंदी मधील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आल आहे. आळंदी मध्ये जोरदार पाऊस असल्याने सोपान पूल, पुंडलिक मंदिर पाण्याखाली आल आहे. त्रिवेणी भागीरथी कुंडाच्या दगडी घाटावर देखील पुराचे पाणी आले आहे. त्यामुळे वारकऱ्यांनी इंद्रायणी नदी मध्ये उतरू नये असं प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे