सतीश मगर, चेअरमन, क्रेडाई- इंडिया

Loksatta Pune Vardhapan 2023 : कला संस्कृती जी तुमच्या- आमच्या सारखे अनेक जण म्हणजे त्या शहरात राहणाऱ्या नागरिकांच्या आचार – विचारापासून बनते त्यातून त्या शहराची एखाद्या शहराची ओळख बनते. पुणे शैक्षणिक, ऐतिहासिकदृष्ट्या एक महत्त्वाचे शहर. सामाजिक बदलांचे शहर. कला, सांस्कृतिक,वैभवशाली परंपरांचे शहर म्हणून त्याची ओळख आहे. ही ओळख पुणे महानगराच्या भावविश्वाचा आधार आहे.

how does hail fall marathi news, how does hail fall in summer marathi news
विश्लेषण: गारांचा पाऊस कडक उन्हाळ्यात कसा पडतो? हिमवर्षाव आणि गारपिटीमध्ये काय फरक?
India Wholesale Inflation Reaches 3 Month High
घाऊक महागाई दर मार्चमध्ये किंचित वाढून तिमाही उच्चांकावर
The Food and Agriculture Organization of the United Nations has projected an increase in wheat production worldwide including in India
भारतात यंदा उच्चांकी गहू उत्पादन? काय कारण? जगात काय स्थिती?
glacier outburst uttarakhand
केदारनाथमध्ये पुन्हा प्रलय येऊ शकतो का? हिमनदी तलावफुटीच्या दुर्घटनांमध्ये होतेय वाढ; कारण काय?

हेही वाचा- Loksatta Pune Vardhapan Din 2023 : नाटक ‘आपलं’ होण्यासाठी…

अगदी ८० च्या दशकापर्यंत पुणे हे खूप आवाक्यात असलेले, तुलनेने शांत आणि निवांत शहर होते. भरपूर पाणी, स्वच्छ हवा आणि संतुलित ऋतुमान ही पुण्याची वैशिष्ट्ये सांगता येत होती. या शहरामध्ये राहणारा कोणताही माणूस शहराच्या दुसऱ्या भागामध्ये काही एक मिनिटांमध्ये सहज पोहोचत होता. सायकलींचे शहर म्हणून पुण्याचा लौकिक कायम होता. पिंपरी चिंचवड ही उद्योगनगरी बनली होती, पण तरीदेखील पुणे आणि पिंपरी चिंचवड या संपूर्ण परिसराला कोणीही महानगर म्हणत नव्हते. पिंपरी चिंचवड परिसरामध्ये असलेल्या अनेक कारखान्यातील चाकरमाने पुणे शहरामध्ये राहून दररोज जा-ये करीत होते.

त्यानंतर ९० च्या दशकात मात्र चित्र वेगाने बदलले. बदलले म्हणजे नक्की काय झाले असा प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर अगदी सहजपणे देता येईल, ते म्हणजे शहराची लोकसंख्या प्रचंड वेगाने वाढली. लोकसंख्या वाढल्यानंतर त्या अनुषंगाने येणाऱ्या सर्वच घटकांमध्ये वेगाने वाढ झाली. औद्योगिकीकरणाच्या झपाट्यामध्ये कारखान्यांमध्ये नोकरीला अनेक भागातून पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये नागरिक राहायला आले. प्रामुख्याने हे सर्व नागरिक महाराष्ट्राच्या विविध भागांमधून आलेले होते. ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी नाही म्हणून शहरात राहून कष्ट केले तर आपण आपले नशीब बदलू शकू असा विचार करून आलेले हे नागरिक होते. त्यामुळे पुण्याची मूळ वैशिष्ट्ये कायम राखत ते पाहता पाहता या शहरामध्ये मिसळून गेले. या नागरिकांना सामाविण्यासाठी शहरामध्ये अनेक बदल झाले.

हेही वाचा- Loksatta Pune Vardhapan Din 2023 : डिजिटल पुणे २०२५

पण आता नव्या काळात माहिती तंत्रज्ञान जैवतंत्रज्ञान व्यवसाय रोजगाराचे प्रमुख केंद्र व देशातील आठवे महानगर म्हणून आता हे सुपरिचित झाले आहे. आजकाल पुणे शहराची ही नवी व वैशिष्ट्ये पुणे शहराचे ग्रोथ इंजिन्स म्हणून आपण याकडे पाहतो. पण काळ बदलाची गती खूप अधिक आहे. पानशेत पुराच्या काळापासून आजपर्यंत या पुणे शहराच्या बदलाच्या गतीचे मोजमाप करता येण्याजोगे आहे. त्याचे टप्पे पाळता येण्याजोगे आहे. मात्र, मला वाटते की यापुढे ते शक्य होणार नाही. कारण पुणे शहरातील बदलांचा विस्तार व व्यापकता ही प्रचंड आहे, त्याचे पैलू देखील अनेक आहेत. इथे स्थलांतरित होणारा वर्ग केवळ महाराष्ट्रीयन राहिलेला नाही तर सबंध देशभरातून स्थलांतर होते आहे. कॉस्मोपॉलिटन पुणे अशी नवी ओळख सुद्धा काही उपनगरांची बनलेली आहे…

या बदलांचा दुसऱ्या बाजूने विचार करताना लक्षात येईल,की केवळ घर, बांधकाम क्षेत्राशी हे बदल निगडित राहिलेले नाहीत. हे बदल सर्वव्यापी झाले आहेत, होत आहेत. गतीने त्यांच्यात बदल होतो आहे. भविष्यातील त्यांची गती अशीच असणार आहे यात कोणतेही दुमत नाही.
पीएमआरडीए आणि बांधकाम क्षेत्र – पुढची वाटचाल…

हेही वाचा- Loksatta Pune Vardhapan Din 2023 : पुणे व्हावे ‘ई-सिटी’!

बांधकाम क्षेत्र हे धोरणांवर व ग्राहक विश्वास व त्याच्या प्रतिसादावर अवलंबून असणारे क्षेत्र राहिलेले आहे. पण मागील काही वर्षात गतीने बदल होत असून, हे क्षेत्र आता सेवा क्षेत्राचे रूप धारण करते आहे. बांधकाम क्षेत्र व गृहनिर्माण क्षेत्र अर्थव्यवस्थेत क्रमांक दोनचे क्षेत्र म्हणून ओळखले जात असले तरी याकडे पाहण्याचा दृष्टिकोन या क्षेत्रासाठीच्या थेट व पूरक धोरणांची कमतरता या क्षेत्राच्या विकासात, उभारणीत मोठा अडथळा आहे असे वारंवार जाणवते. अशा परिस्थितीतही आज रोजीदेखील गृहनिर्माण क्षेत्र क्रमांक दोनचे महसूल मिळवून देणारे क्षेत्र आहे आणि त्यात कुठेही कमतरता जाणवत नाही. दुसरीकडे पुणे शहराचा विचार करता पुणे महानगराच्या विकासाचे नेतृत्व यापुढे पीएमआरडीए करताना दिसेल. पीएमआरडीए क्षेत्रांतर्गत येणाऱ्या नव्या भागांचे नियोजन व त्यातही टाऊन प्लॅनिंग स्कीम्स हा या प्रक्रियेतील महत्त्वाचा केंद्रबिंदू आहे असे मला वाटते.

नव्या पुणे महानगराच्या वैशिष्ट्यांचा विचार करता ६ हजार ९०० चौरस किलोमीटर एवढ्या भव्य क्षेत्रासाठी सुमारे पुढील वीस वर्षांसाठी म्हणजे २०४३ पर्यंतसाठीचा हा आराखडा बनवला गेला आहे. आजच्या नियोजनाप्रमाणे ८१४ गावांचा समावेश असलेला व सुमारे ७३ लाख लोकसंख्येसाठी हा आराखडा असणार आहे.

पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, दोन्ही महापालिकांच्या शिवाय त्यांच्या हद्दीबाहेर असलेली गावे, दोन कँटॉनमेंट बोर्ड, सात नगर परिषदा व एमआयडीसीसारख्या विशेष एजन्सीजचा स्वतंत्र विकास आराखडा, त्यासंबंधित विकासाचे अधिकार संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांना आहेतच ते अबाधित ठेवून या सर्व क्षेत्रासाठीचा सर्वंकष विचार या पीएमआरडीएच्या विकास आराखड्यात केला गेला आहे. आज रोजी पीएमआरडीए क्षेत्रातील २७ टक्के क्षेत्र नागरी तर ७३ टक्के क्षेत्र हे ग्रामीण आहे. २७ टक्के क्षेत्रात ६३ टक्के, तर ७३ टक्के क्षेत्रावर केवळ ३७ टक्के लोकसंख्या राहते.

उत्तर बाजूस चाकण, खेड, तळेगावच्या रूपाने विकसित झालेले औद्योगिक क्षेत्र लक्षात घेवून लॉजिस्टिक इंड्रस्टीयल क्लस्टर, मावळ मुळशी भागात पश्चिमेला सह्याद्रीच्या रूपाने असलेल्या डोंगररांगा लक्षात घेवून टुरिझम क्लस्टर, तर पूर्वेला उरळी कांचन, यवत गावांना लाभलेला नदी किनारा, कॅनॉलची उपलब्धता लक्षात घेऊन शेती पूरक उद्योगांना व त्यासंबंधीत क्लस्टरचा विचार यात केला गेला दिसतो आहे. आणि विशेषतः भविष्यातील घरांची वाढती गरज लक्षात घेऊन आवाक्यातील घरांसाठी २६ टाऊनप्लॅनिंग स्कीम्स प्रस्तावित करण्यात आल्या आहेत.
पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका सीमा क्षेत्रापासून पाच ते सात किलोमीटर परिसरात रिजनल कॉरिडॉर बनवले जाणार आहेत. केंद्रभूत विकास मॉड्यूल म्हणून १८ अर्बन (शहरी) ग्रोथ सेंटर्स, तर ८ रूरल (ग्रामीण) ग्रोथ सेंटर्स उभारण्यात येणार आहेत. त्यातील प्रत्येक ग्रोथ सेंटरमध्ये एक ते दीड लाख लोकसंख्येचा विचार करून त्यांना स्वतंत्र स्टेटस व प्लॅन बनविण्यात येत आहेत. हा बदल नव्या पुणे महानगराचा पाया ठरणार आहे, असे मला वाटते.

हेही वाचा- Loksatta Pune Vardhapan Din 2023 : भविष्यातील पुणे !

त्यांना आवश्यक सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन त्यात करण्यात आले आहे, जेणेकरून खासगी विकसकामार्फंत टाऊनशीपमधील व्यवस्थांप्रमाणे त्या परिसरातील नागरिकांना त्याच्या दररोजच्या जीवनासाठीच्या सोयी- सुविधा त्याच परिसरात उपलब्ध होतील. शाळा, कॉलेज, महाविद्यालये, रूग्णालये, बाजारपेठा या मूलभूत गरजांची पूर्तता देखील त्याच परिसरात होताना दिसेल.

मगरपट्टासिटी, नांदेडसिटी मधील सुविधासंपन्न स्वयंपूर्ण शहरांचा अनुभव म्हणून मी इथे विश्वासाने सांगू इच्छितो,की या उद्देशाने पीएमआरडीएमधील नवीन भागांचा व प्रस्तावित विस्तारित शहरांच्या विकासाचे नियोजन केल्यास एक सुनियोजित पुणे निश्चितपणे विकसित होताना आपण अनुभवू शकू…
मॅकेन्झी या प्रथितयश संस्थेने केलेल्या अहवालानुसार २०३० साली पुणे शहराची लोकसंख्या ही एक कोटीच्या पुढे असेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्याअनुषंगाने इथे स्थलांतरित होणाऱ्या लोकांसाठी मोठ्या संख्येने घरांची गरज भासणार आहे. दुसरीकडे भविष्यात आवाक्यातील घर ही संकल्पना पर्याय नसून गरज होईल असे चिन्हे दिसत आहेत. पण आवाक्यातील घरांची संकल्पना व्याख्या आणि प्रत्यक्षात उपलब्धता यांच्यातील तफावत असल्याचेही दिसते.

हेही वाचा- Loksatta Pune Vardhapan Din 2023 : दिशा देणारे संशोधन

सर्वांसाठी घर या संकल्पनेच्या माध्यमातून केंद्र शासन व राज्य शासन ही तफावत दूर करण्यासाठी प्रयत्नशील आहे, त्याच प्रयत्नांचा भाग म्हणून नुकत्याच सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात केंद्र शासनाने आवाक्यातील घरांसाठीची तरतूद ६६ टक्क्यांनी वाढवून ७५ हजार कोटी रुपये केली आहे. त्यामुळे आगामी काळात सामान्य लोकांची आवाक्यातील घरांचे, हक्काच्या घराचे स्वप्न साकार होईल अशी आशा करूया…दुसरीकडे मोठ्या आरामदायी घरांची गरज देखील तितकीच आहे.

पुणे महानगराच्या संदर्भाने आणखी एक वेगळी गोष्ट म्हणजे जुन्या भागातील बदलांचा विचार करता पुनर्विकास प्राध्यानक्रम असेल आणि तो असावाही. कारण ती गरज आहे आणि मोठी घरे, जुन्या शहरात व जुन्या शहरातील प्रतिष्ठेचे भाग ओळखले जाणारी उपनगरे जसे की, कोथरूड, प्रभात रोड वगैरे.. इथे निवासासाठी लोकांचा प्राधान्यक्रम आहे…

पण असे आपण निश्चितपणे म्हणू शकतो,की भविष्यात शहरातील उपनगरे असतील किंवा शहराच्या सीमेवरच्या विकसनशील उपनगरांमध्ये टीपी स्कीम आणि खाजगी विकसकांच्या प्रकल्प उभारणीच्या सहभागाने ही घरांची गरज पूर्ण होताना दिसेल. घरासोबत किंवा गृहनिर्माण क्षेत्रासोबतच पुण्याचे अनेक विविध प्रश्नदेखील आहेत आणि तेही तेवढेच महत्त्वाचे आहेत. हे प्रश्न अनेक वेळा पुण्यातील बांधकाम क्षेत्रावर गृहनिर्माण किंवा घरांच्या निवडीवर ग्राहकांच्या मानसिकतेवर परिणाम करताना दिसतात, ज्यामध्ये वाहतूक, पाणी, कचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन आदी असे अनेक विषय प्राधान्याने सांगितले जाऊ शकतात.

शहर आकांक्षावर उभे राहत नाही तर ते धोरण आणि अंमलबजावणीसह नागरिकांच्या सहभागावर उभे राहते. दरम्यान, पुणे महाराचा प्रवास नेहमीच सुज्ञ चिकित्सक नागरिकांच्या सहभागाने परिपूर्ण होत आलेला आहे. उर्वरित भाग शासन धोरण अंमलबजावणीच्या योग्य पद्धतीने होईल असा विश्वास आहे.

(शब्दांकन – नरेंद्र जोशी)