विद्यापीठ अनुदान आयोगाचे निर्देश

पुणे : नवीन शैक्षणिक धोरणात मांडलेली दूरदृष्टी प्रत्यक्षात आणण्यासाठी नवीन शैक्षणिक धोरण कक्ष स्थापन करण्याचे निर्देश विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) देशभरातील उच्च शिक्षण संस्थांना दिले आहेत. तसेच, यूजीसीच्या योजना आणि उपक्रमांची या कक्षाच्या माध्यमातून अंमलबजावणी करण्याची सूचनाही देण्यात आली आहे.

pune , aicte, vernacular language
तंत्रशिक्षण संस्थांतील अध्यापनात आता स्थानिक भाषेचा अधिकाधिक वापर… काय आहे महत्त्वाचा निर्णय?
idea of ​​educational institutes
बीबीए, बीसीएबाबत शिक्षण संस्थांची नवी शक्कल… होणार काय?
allahabad high court ani photo
“यूपी बोर्ड ऑफ मदरसा एज्युकेशन अ‍ॅक्ट घटनाबाह्य”, अलाहाबाद उच्च न्यायालयाचा मोठा निकाल; मदरसेही शिक्षण विभागाच्या अखत्यारीत!
schools Maharashtra principals
राज्यातील २५ हजारांहून अधिक शाळा मुख्याध्यापकांविना? संचमान्यतेच्या सुधारित निकषांचा शासन निर्णय रद्द करण्याची मागणी

विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष डॉ. डी. पी. सिंग यांनी या संदर्भातील परिपत्रक विद्यापीठांच्या कुलगुरूंना दिले आहे. नव्या शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने शिक्षण व्यापक करण्यासाठी, गुणवत्ता वाढवण्यासाठी काही बदल करण्यात आले आहेत. त्यात अॅककॅडमिक क्रेडिट बँक, कार्यप्रशिक्षणाचा समावेश असलेला पदवी अभ्यासक्रम, ‘स्वयम’वरील अभ्यासक्रमांना ४० टक्के श्रेयांक, परदेशी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र कार्यालय, माजी विद्यार्थ्यांना विद्यापीठ स्तरावर जोडून घेणे अशा काही योजना यूजीसीने मांडल्या आहेत. तसेच यूजीसीच्या क्वालिटी मेन्टेड अंतर्गत शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी गुरू दक्षता, मानवी आणि व्यावसायिक मूल्यांची रूजवण करण्यासाठी मूल्य प्रवाह, अपंग विद्यार्थ्यांसाठीच्या सुविधांची निर्मिती, भारतीय भाषांमध्ये शैक्षणिक साहित्याची उपलब्धता आदी उपक्रम यूजीसीने हाती घेतल्याची माहिती डॉ. सिंग यांनी पत्रात दिली आहे.

उच्च शिक्षण संस्थांच्या सक्रिय सहभागाद्वारेच विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणे, भारताला जागतिक पातळीवर शैक्षणिक महाशक्ती म्हणून घडवणे शक्य आहे. काही उच्च शिक्षण संस्थांनी त्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र नव्या शैक्षणिक धोरणात मांडलेली दूरदृष्टी प्रत्यक्षात आणण्यासाठी नवीन शैक्षणिक धोरण कक्षाची स्थापना करण्याबाबतही नमूद करण्यात आले आहे.