भारतीय जनता पार्टीचे आमदार लक्ष्मण जगताप हे गंभीर आजाराने ग्रस्त आहेत. त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. नुकताच त्यांना डिस्चार्ज देण्यात आला असून राज्यसभा निवडणुकीच्या मतदानासाठी ते रुग्णवाहिकेतून मुंबईत दाखल झाले होते. त्यांच्या याच धाडसामुळे आणि धैर्यामुळं मी खासदार झालो आहे, असं नवनिर्वाचित खासदार धनंजय महाडिक यांनी म्हणत जगताप कुटुंबीयांचे आभार मानले. त्यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये जाऊन जगताप आणि त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी आमदार यांचे बंधू शंकर जगताप हे देखील उपस्थित होते. 

धनंजय महाडिक म्हणाले की, राज्यसभेचा धक्कादायक आणि ऐतिहासिक निकाल संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला. देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी तिसरा उमेदवार उभा करणार आणि निवडून आणणार असा चंग बांधला होता. ते त्यांनी सत्यात उतरवलं. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. ते नेहमीच घोषणा करत होते की आमचं संख्याबळ जास्त असल्याने आमचे चारही सदस्य निर्विवाद निवडून येतील.

drama review of Himalayachi sawali
‘ती’च्या भोवती..! हिमालयाएवढी खंबीर!
Ganesh Naik-Subhash Bhoirs meeting is the beginning of new political equation
गणेश नाईक-सुभाष भोईर यांच्या भेटीच्या चर्चेने नव्या राजकीय समीकरणाची नांदी?
Sharmila Pawar
अजित पवारांच्या सख्ख्या वहिनी आता सुप्रिया सुळेंच्या प्रचारात; म्हणाल्या, “आपल्या माहेरवाशिणीला…”
sharad pawar rohit pawar chandrakant patil
“भाजपाचं लक्ष्य स्पष्ट, पण बंदूक अजित पवारांच्या खांद्यावर”, चंद्रकांत पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्यावर रोहित पवारांचा पलटवार

पण, देवेंद्र फडणवीस यांनी जी रणनीती आखली, त्याचा परिचय राज्यसभेच्या निवडणुकीत आला. आमचा जो विजय आहे तो आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांना समर्पित केला. कारण ही तसं आहे, गेल्या काही दिवसांपासून जगताप हे आजारी आहेत. ते आयसीयूमध्ये उपचार घेत होते. अशा परिस्थितीत आम्ही चिंतेत होतो. अटीतटीची लढाई होती. मतदानाला त्यांना बोलावणं हे आम्हाला विचित्र वाटत होतं. पण पार्टी स्पीरीट काय असतं ते त्यांनी दाखवून दिलं आणि रुग्णवाहिकेतून ते मुंबईत दाखल होत मतदान केलं. मला निश्चितपणे सांगायचं आहे की त्यांच्या या धैर्यामुळं, धाडसामुळे खासदार होऊ शकलो.