पतीच्या छळाला कंटाळून नवविवाहित महिलेने पवना नदीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (२८ जुलै) सांगवी भागात घडली. पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसांनी पतीला अटक केली.
तृप्ती अवधूत भुंजे (वय २४) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी तिचा पती अवधूत (वय २७, रा. ढोरेनगर, सांगवी) याला अटक करण्यात आली आहे. त्याच्या चार नातेवाइकांविरुद्ध सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तृप्तीचे वडील सतीश लोखंडे (वय ५५, रा. शिरोली, ता.बारामती, जि. पुणे) यांनी या संदर्भात सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जून महिन्यात तृप्तीचा विवाह अवधूत याच्याशी झाला होता. विवाहात हुंडा दिला नाही तसेच स्वयंपाक नीट करता येत नाही, असे टोमणे पती, सासू, सासरे व नणंदेकडून तिला मारण्यात येत होते. शारीरिक व मानसिक छळ असह्य़ झाल्याने गुरुवारी तृप्ती घरातून कोणाला काही न सांगता बाहेर पडली. सांगवीतील वेताळ महाराज विसर्जन घाट येथे पवना नदीच्या पात्रात तिने उडी मारून आत्महत्या केली. तिच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी पतीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलीस उपनिरीक्षक एम.टी. शिंदे तपास करत आहेत.

Man Commits Suicide, Killing Second Wife , Killing Son, Immoral Relationship, nagpur crime, Immoral Relationship crime, nagpur news, murder news, crime news, marathi news,
नागपूर : अनैतिक संबंधामुळेच घडले हत्याकांड, तिघांवर एकाच ठिकाणी अंत्यसंस्कार
vasai crime news, wife s murder accused marathi news
वसई: पत्नीच्या हत्येचा आरोपी पॅरोलवरून फरार, वालीव पोलिसांनी ५ वर्षानंतर केली अटक
Pune, Woman, Commits Suicide, Over Property Dispute, Case Registered, Brother, Relatives, police, crime news, marathi news,
पुणे : संपत्तीच्या वादातून महिलेची गळफास घेऊन आत्महत्या; सख्या भावासह नातेवाईकांविरुद्ध गुन्हा
Mukhtar Ansari death
कुख्यात गुंड मुख्तार अन्सारीच्या तुरुंगात मृत्यूनंतर न्यायालयीन चौकशीचे आदेश