लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या उपायुक्तपदी निखील पिंगळे यांची नियुक्ती करण्यात आली. गुन्हे शाखेचे उपायुक्त अमोल झेंडे यांची वाहतूक शाखेत नियुक्ती करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले. विशेष शाखेच्या उपायुक्तपदी जी. श्रीधर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पिंगळे यांनी गुन्हे शाखेच्या उपायुक्तपदाची सूत्रे स्वीकारली. पिंगळे यांनी यापूर्वी पंढरपूरमध्ये उपविभागीय अधिकारी, वर्ध्यात अतिरिक्त पोलीस अधीक्षक, गडचिरोलीत राज्य राखीव पोलीस दलाचे समादेशक, लातूरमध्ये पोलीस अधीक्षक, गोंदियात पोलीस अधीक्षक म्हणून काम केले. पिंगळे मूळचे पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगरमधील आहेत. पुण्यातून त्यांनी अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केले.

आणखी वाचा-पिंपरी : शहर पोलीस दलात बदल्यांचे सत्र सुरूच; आता ‘या’ अधिकाऱ्यांच्या बदल्या

पुणे पोलिसांच्या विशेष शाखेच्या उपायुक्तपदी जी. श्रीधर यांची नियुक्ती करण्यात आली. विशेष शाखेतील उपायुक्त हिम्मत जाधव यांची परिमंडळ चारच्या उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली. श्रीधर, पिंगळे यांची नुकतीच पुणे पोलीस दलात बदली झाली.