scorecardresearch

Premium

नऊ पोलीस कर्मचारी निलंबित; ससून रुग्णालयातून अमली पदार्थ तस्कर पसार

ससून रुग्णालयातून अमली पदार्थ तस्कर ललित पाटील सोमवारी रात्री पसार झाल्यानंतर महिला पोलीस उपनिरीक्षकासह नऊ पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचा आदेश पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी दिला.

sasoon hospital
नऊ पोलीस कर्मचारी निलंबित; ससून रुग्णालयातून अमली पदार्थ तस्कर पसार (प्रतिनिधिक छायाचित्र )

पुणे : ससून रुग्णालयातून अमली पदार्थ तस्कर ललित पाटील सोमवारी रात्री पसार झाल्यानंतर महिला पोलीस उपनिरीक्षकासह नऊ पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचा आदेश पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी दिला.

पोलीस उपनिरीक्षक मोहिनी डोंगरे, हवालदार आदेश सीताराम शिवणकर, पोलीस नाईक नाथाराम काळे, शिपाई तिरप्पा बनसोडे, अमित जाधव, जनार्दन काळे, विशाल टोपले, स्वप्नील शिंदे, दिगंबर चंदनशिवे अशी निलंबित करण्यात आलेल्यांची नावे आहेत. ससून रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ शनिवारी (३० सप्टेंबर) रात्री दोन कोटी १४ लाख रुपयांचे मेफेड्रोन जप्त करण्यात आले होते. या प्रकरणात ससून रुग्णालयात उपचार घेत असलेल्या ललित पाटील याच्यासह सुभाष जानकी मंडल (वय २९, रा. देहूरोड, मूळ झारखंड) आणि रौफ रहिम शेख (वय १९, रा. ताडीवाला रस्ता) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

NIMA, nashik industries and manufacturers association, workers without helmet, punishment to factory owners
नाशिक : विनाहेल्मेट कामगारप्रश्नी कंपनी मालकांना दोषी धरणे अयोग्य, निमाचे प्रादेशिक परिवहनला साकडे
lalit anil patil, Drug smuggler Lalit Patil released from Sassoon hospital
पुणे: अमली पदार्थ तस्कर ललित पाटील ससून रूग्णालयातून पसार
Pradeep Bodkhe's free lessons 25 students selected police force 14 students selected Agniveer Sainik Recruitment
नोकरी सांभाळून ‘ते’ देतात पोलिस, सैन्य भरतीचे मोफत धडे; एकाच प्रयत्नात १४ अग्निवीर, २५ जण पोलीस दलात
Bareilly SDM Viral Video
तक्रार करण्यासाठी कार्यालयात आलेल्या व्यक्तीलाच SDM ने बनवला ‘कोंबडा’, VIDEO समोर येताच संतापले नेटकरी

हेही वाचा >>>पिंपरीतील १०८ गणेश मंडळांना ‘आव्वाज’ भोवणार; पोलीस दाखल करणार खटले

ललित पाटीलला चाकण परिसरात मेफेड्रोन बाळगल्याप्रकरणी दोन वर्षांपूर्वी चाकण परिसरातून अटक करण्यात आली होती. कारागृहात असताना त्याची मंडल याच्याशी ओळख झाली होती. शेख ससून रुग्णालयातील उपाहारागृहात कामगार आहे. शेख याच्यामार्फत मंडल पाटीलला मेफेड्रोन पोहचविणार होता. पाटील जून २०२३ पासून ससून रुग्णालयात उपचार घेत होता. सोमवारी (२ ऑक्टोबर) सायंकाळी बंदोबस्तावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना गुंगारा देऊन ससून रुग्णालयातील वाॅर्ड क्रमांक १६ मधून पसार झाला. कर्तव्य पार पाडताना बेफिकिरी दाखविल्याप्रकरणी नऊ जणांना पोलीस दलातून निलंबित करण्यात आले.

हेही वाचा >>>पिंपरी-चिंचवड दौऱ्यानंतर शरद पवार गटात इनकमिंग सुरू; कार्यकर्त्यांची ताकद वाढवण्यासाठी लवकरच होणार मेळावा

ललित पाटीलचा शोध सुरू

पाटील ससून रुग्णालयातून सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास पसार झाला. बंदोबस्तावरील पोलिसांंना गुंगारा देऊन तो वाॅर्ड क्रमांक १६ मधून बाहेर पडला. पसार झालेल्या पाटीलचा माग काढण्यासाठी पोलिसांनी पथके रवाना केली आहेत. पुणे स्टेशन परिसरातून निघालेल्या पाटीलला सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी टिपले आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Nine police personnel suspended from sassoon hospital in connection with drug trafficker case pune print news rbk 25 amy

First published on: 03-10-2023 at 23:40 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×