scorecardresearch

Premium

लव जिहाद प्रकरण : शाहरुख खानच्या मुलाची चिंता करणार्‍या ताई पीडित मुलींची भेट घेणार का? नितेश राणेंची सुप्रिया सुळेंवर टीका

भाजपाचे नेते आमदार नितेश राणे यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली.

Nitesh Rane criticise Supriya Sule
लव जिहाद प्रकरण : शाहरुख खानच्या मुलाची चिंता करणार्‍या ताई पीडित मुलींची भेट घेणार का, नितेश राणेंची सुप्रिया सुळेंवर टीका (छायाचित्र – लोकसत्ता टीम/ग्राफिक्स)

पुणे : “पुण्यातील मंचर आणि मुंढवा येथील अल्पवयीन तरुणीसोबत मुस्लिम तरुणांकडून अन्याय अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील काही ताई म्हणतात की, लव जिहाद, धर्मांतर या सारख्या घटना घडत नाही. मी त्या ताईंना एक विचारू इच्छितो की, ताई तुला शाहरुख खानच्या मुलाची चिंता आहे, या पीडित मुलींची चिंता करून भेट घेणार का?” अशी मागणी करत भाजपाचे नेते आमदार नितेश राणे यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली.

पुण्यातील मुंढवा भागात राहणार्‍या तरुणीसोबत लव जिहादची घटना घडल्या प्रकरणी सकल हिंदू समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या निषेध मोर्चाचे नेतृत्व भाजपाचे नेते आमदार नितेश राणे यांनी केले. मुंढवा येथील धर्मवीर छत्रपती संभाजी राजे चौक ते जय हिंद चौक घोरपडी दरम्यान मोर्चा काढत निषेध नोंदविला. हिंदू मुलींचा जीव घेणार्‍या नराधम जिहादीला फाशी झाली पाहिजे. ही मागणी मोर्चात सहभागी झालेल्या महिलांनी केली.

thackeray group organizes hou de charcha event in kalyan dombivali
कल्याण-डोंबिवलीत ‘होऊ द्या चर्चां’च्या चौक सभा; शिवसेना ‘उबाठा’तर्फे आयोजन
Rishi Sunak and Akshata Murthy
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या पत्नी अक्षता मूर्ती यांचा G20 मधून परतताच मोठा निर्णय, ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का
The employee boarded the truck to collect the toll from the truck driver
ट्रक चालकाकडून टोलचे पैसे घेण्यासाठी कर्मचारी चढला चालत्या ट्रकवर; Video पाहून हसू आवरणार नाही…
aditya thackeray letter to bmc commissioner demand to disposed accumulated waste in city
मुंबईत साचलेल्या कचऱ्याच्या ढिगांची विल्हेवाट लावावी; आदित्य ठाकरे यांचे मुंबई महानगरपालिका आयुक्तांना पत्र

हेही वाचा – पुणे: भाडेतत्वावर घेतलेल्या मोटारीची नागपूरमध्ये विक्री; चोरट्यांची टोळी गजाआड

राज्यात हिंदू मुलीचे धर्मांतर होत नाही. अन्याय अत्याचार होत नाही. तिहेरी तलाक राहिला पाहिजे. अशा प्रकारची भूमिका राज्यातील काही नेते मंडळी करीत आहे, अशा शब्दात नितेश राणे यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांवर निशाणा साधला. तसेच या लव जिहाद प्रकरणातील आरोपींना वाचविण्याचे काम काही पोलीस अधिकारी करित आहे. त्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे करणार असल्याचे ते म्हणाले.

हेही वाचा – पुणे: गुंतवणुकीच्या आमिषाने संगणक अभियंत्याची ५० लाखांची फसवणूक

केंद्रातील आणि राज्यातील सरकार हिंदुत्ववादी विचारांचे सरकार आहे. त्यामुळे राज्यातील हिंदूंवर कोणत्याही प्रकारे अन्याय होणार नाही, याबाबत सरकार निश्चित काळजी घेत आहे. या सर्व घटना लक्षात घेऊन लव जिहाद विरोधात राज्य सरकार कायदा करणार असल्याचे नितेश राणे यांनी सांगितले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Nitesh rane criticise supriya sule over love jihad case svk 88 ssb

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×