scorecardresearch

पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर नितेश राणेंच्या पत्नीच्या मोटारीचा किरकोळ अपघात; ट्रक चालक ताब्यात

या प्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतलं आहे. या घटनेत कोणीही जखमी नाही.

nitesh rane s wife s minor car accident
राणे कुटुंबियांच्या मोटारीचा किरकोळ अपघात

पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर उर्से टोल नाका येथे राणे कुटुंबियांच्या मोटारीचा किरकोळ अपघात झाला आहे. या मोटारीत नितेश राणे यांची पत्नी, मुलं आणि नातेवाईक होते. अशी माहिती पिंपरी-चिंचवड पोलिसांनी दिली आहे. हा अपघात सायंकाळी साडेपाच च्या सुमारास उर्से टोल नाका येथे झाला आहे. मुंबईहून पुण्याच्या दिशेने येताना हा अपघात झाला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नितेश राणेंनी पत्नी, मुलं हे नातेवाईकांसह खोपोली वरून पुण्याच्या दिशेने येत होते. सायंकाळी साडेपाच च्या सुमारास पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावरील उर्से टोल नाका येथे टोल भरण्यासाठी राणे कुटुंबीय प्रवास करत असलेली मोटार रांगेत थांबली होती. तेव्हा पाठीमागे टोल भरण्यासाठी थांबलेल्या ट्रक ने राणे कुटुंबियांच्या मोटारीला किरकोळ धडक दिली. यात मोटारीचा किरकोळ नुकसान झालं आहे. या प्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतलं आहे. तो कर्नाटक येथील असल्याचं सांगण्यात येत आहे. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झालं नाही. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. 

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-09-2022 at 23:19 IST
ताज्या बातम्या