१६ जुलै पर्यंत पाण्याचे नियोजन : पालकमंत्री बापट

पुणे शहराला पाणी पुरवठा करणाया चार ही धरणात मिळून १०.२६ टीएमसी इतका पाणीसाठा असून त्याचे नियोजन १६ जुलैपर्यंत करण्यात आले आहे. त्यामुळे पुणेकरांना कोणत्याही परिस्थिती कपातीला सामोरे जावे लागणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिली. पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली कालवा समितीची बैठक आज विधानभवन येथे पार पडली. यावेळी महापौर मुक्ता टिळक,उपमहापौर नवनाथ कांबळे,आधिकारी आणि जिल्ह्यातील आमदार उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री बापट म्हणाले की, पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला १.६३ टीएमसी  ,पानशेत ६.७० टीएमसी,वरसगाव १.९३ टीएमसी आणि टेमघर शून्य टीएमसी असा एकूण या चार ही धरणात १०.२६ टीएमसी आणि ३५ टक्के इतका पाणीसाठा आहे. हा पाणीसाठा लक्षात घेता. १६ जुलै पर्यंत पाण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पुणे आणि ग्रामीण भागातील नागरिकांना कोणत्याही परिस्थिती पाणी कमी पडू देणार नसून इतर दुरूस्तीच्या कामासाठी शहरातील किमान तीन वेळेस पाणी पुरवठा बंद ठेवावा लागणार आहे. त्याच बरोबर ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी २० एप्रिलपासून आवर्तन सोडले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.