scorecardresearch

Gram Panchayat Election Result 2022 : भोर तालुक्यातील म्हाकोशी गावात सर्वाधिक मते नोटाला; द्वितीय क्रमांकाचा उमेदवार विजयी घोषित

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाच्या नियमाचा दाखला देत नोटाच्या खालोखाल मते मिळालेल्या उमेदवाराला विजयी घोषित केले

Gram Panchayat Election Result 2022 : भोर तालुक्यातील म्हाकोशी गावात सर्वाधिक मते नोटाला; द्वितीय क्रमांकाचा उमेदवार विजयी घोषित
भोर तालुक्यातील म्हाकोशी गावात सर्वाधिक मते नोटाला (संग्रहित छायाचित्र)

जिल्ह्याच्या भोर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत मंगळवारी एक अजब निकाल लागला. म्हाकोशी गावात विजयी उमेदवारापेक्षा नोटाला अधिक मते पडली. मात्र, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाच्या नियमाचा दाखला देत नोटाच्या खालोखाल मते मिळालेल्या उमेदवाराला विजयी घोषित केले. त्यामुळे दुसऱ्या क्रमांकाची मते मिळालेल्या रेखा साळेकर या विजयी झाल्या.

हेही वाचा- Gram Panchayat Election Result 2022 : पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीच वर्चस्व कायम; अजित पवारांचा करिष्मा दिसला!

भोरमधील म्हाकोशी गावात प्रभाग क्रमांक एकमध्ये हा निकाल लागला. या प्रभागात सर्व साधारण महिलांसाठी दोन जागा आरक्षित होत्या. त्याकरिता तीन उमेदवारांचे अर्ज दाखल झाले होते. विजयासाठी तिन्ही उमेदवारांनी प्रचार केला. मतदानाच्या दिवशी ३४० मतदारांनी मतदान केले. संगीता तुपे यांना १२३ मते मिळाली आणि दोन पैकी एका जागेवर त्यांचा विजय निश्चित झाला. त्यानंतर दुसऱ्या उमेदवाराच्या जागेसाठी नोटाला १०४, तर साळेकर यांना ४३, तर कविता शेडगेंना ४२ मते मिळाली. निवडणूक निर्णय अधिकारी सचिन पाटील यांनी निवडणूक आयोगाच्या नियमाचा दाखला देत नोटा पर्यायाला मिळालेल्या मतांची संख्या लक्षात न घेता त्याखालोखाल सर्वाधिक मते मिळालेल्या साळेकर यांना विजयी घोषित केले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 20-12-2022 at 22:57 IST

संबंधित बातम्या