पुणे : शहरात जवळपास ४७८ धोकादायक वाडे आणि इमारती आहेत. त्यापैकी अतिधोकादायक २८ वाडे महापालिका प्रशासनाने पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाडले असून, धोकादायक असलेल्या इतर ४५० वाड्यांना महानगरपालिकेने नोटिसा बजावल्या आहेत. महापालिका प्रशासनाने पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील ३३ धोकादायक वाडे आणि इमारती पाडल्या आहेत. या ठिकाणच्या नागरिकांचे इतरत्र स्थलांतर करण्यात आले आहे.

शहरात सध्या पाऊस जोर धरतो आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील चार ते पाच दिवस चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. पावसामध्ये दरवर्षी शहरात काही जुन्या इमारतींच्या भिंती किंवा काही भाग कोसळण्याचे प्रकार घडतात. हे प्रकार टाळण्यासाठी पावसाळ्यात धोकादायक इमारती, वाडे पडून होणाऱ्या दुर्घटनांना आळा घालण्यासाठी पालिकेने धोकादायक इमारती उतरवण्याची खास मोहीम हाती घेतली आहे. दरवर्षी पावसाळ्यात सीमाभिंती आणि जुन्या इमारती कोसळून होणारी जीवितहानी लक्षात घेऊन महापालिकेने सीमाभिंती आणि जुन्या इमारतींचे सर्वेक्षण करते. त्यानंतर धोकादायक इमारतींना नोटीस देण्यात येतात.

navi mumbai illegal nursery marathi news
नवी मुंबई: कारवाईनंतरही रोपवाटिका उभी, एनआरआय परिसरात डीपीएस शाळेजवळील भूखंडावर पुन्हा अतिक्रमण
municipality keeping eye after removing the encroachment on Belpada hill
पनवेल : बेलपाडा टेकडीवरील अतिक्रमण हटविल्यानंतर पालिकेची नजर
Ajit Pawar gave a public confession Said Hooliganism in the industrial area
अजित पवारांनी दिली जाहीर कबुली; म्हणाले, ‘औद्योगिक पट्ट्यात गुंडगिरी…’
tank bomb shell Hinjewadi
हिंजवडीत पुलाचे काम करताना रणगाड्याचे बॉम्बशेल सापडले

राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचना विचारात घेवून महापालिकेने अत्यंत धोकादायक (सी -एक), दुरुस्ती आवश्यक (सी -दोन), रिक्त न करता दुरुस्ती योग्य (सी-दोन) अशी वाड्यांची वर्गवारी केली आहे. या वर्गवारीनुसार सी एक मध्ये दोन, सी दोन मध्ये ३१६, सी तीन मध्ये १३४ वाड्यांचा समावेश आहे. दरम्यान, दरवर्षी प्रमाणे यंदाही महापालिका प्रशासनाने पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर धोकादायक वाड्यांची पाहणी केली जाते. धोकदायक वाड्यांना इमारती खाली करण्याच्या नोटिसा देण्यात आल्या होत्या. त्यानंतर २८ धोकादायक वाड्यांवर कारवाई करत पालिकेने ते उतरवले आहेत. तेथील नागरिकांना अन्यत्र स्थलांतरित करण्यात आले आहे. शहरातील बहुतांशी जुन्या वाड्यांमध्ये वाडामालक स्वतः राहत नसून वर्षानुवर्षे तेथे भाडेकरू आहेत. अशा सर्व भाडेकरूंना वाडा मालकाला कल्पना देऊन अन्य ठिकाणी जाण्यास सांगण्यात आले असून, त्यास स्वत: जीविताचे महत्त्व जाणून त्यांनीही वाडा रिकामा केल्याचे बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले आहे.

शहरात २८ वाड्यांमधील सुमारे ५५ कुटुंबांनी स्वत:हून नोटीस दिल्यास वाडे खाली केले आहेत. तर सी-दोन वर्गात म्हणजेच मोठ्या प्रमाणात दुरुस्तीची गरज असलेल्या ३२६ इमारतींना नोटीस देऊन त्यांचा मोडकळीस आलेला बाह्यभाग काढून टाकण्याची सूचना करण्यात आली होती. यापैकी ११ जणांनी स्वतःहून तो भाग हटविला आहे. तर सी-तीन वर्गात असलेल्या १३४ मिळकतींना दुरुस्तीसाठी सूचना करण्यात आली असून, यापैकी नऊ जणांनी दुरुस्ती केली असून, अन्य रहिवाशांकडून ही दुरुस्तीची कामे सुरु आहेत.

– प्रवीण शेंडे, अभियंता, बांधकाम विभाग