पुणे : शहरात जवळपास ४७८ धोकादायक वाडे आणि इमारती आहेत. त्यापैकी अतिधोकादायक २८ वाडे महापालिका प्रशासनाने पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाडले असून, धोकादायक असलेल्या इतर ४५० वाड्यांना महानगरपालिकेने नोटिसा बजावल्या आहेत. महापालिका प्रशासनाने पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील ३३ धोकादायक वाडे आणि इमारती पाडल्या आहेत. या ठिकाणच्या नागरिकांचे इतरत्र स्थलांतर करण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शहरात सध्या पाऊस जोर धरतो आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील चार ते पाच दिवस चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. पावसामध्ये दरवर्षी शहरात काही जुन्या इमारतींच्या भिंती किंवा काही भाग कोसळण्याचे प्रकार घडतात. हे प्रकार टाळण्यासाठी पावसाळ्यात धोकादायक इमारती, वाडे पडून होणाऱ्या दुर्घटनांना आळा घालण्यासाठी पालिकेने धोकादायक इमारती उतरवण्याची खास मोहीम हाती घेतली आहे. दरवर्षी पावसाळ्यात सीमाभिंती आणि जुन्या इमारती कोसळून होणारी जीवितहानी लक्षात घेऊन महापालिकेने सीमाभिंती आणि जुन्या इमारतींचे सर्वेक्षण करते. त्यानंतर धोकादायक इमारतींना नोटीस देण्यात येतात.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Notice administration dangerous houses demolished pune print news ysh
First published on: 06-07-2022 at 11:23 IST