कुख्यात गुन्हेगार पिस्तुलासह जेरबंद

शहरातील वाढत्या गुन्ह्यांना पायबंद घालण्यासाठी गुन्हे शाखेकडून गस्त घालण्यावर भर दिला जात आहे.

man arrest
प्रतिनिधिक छायाचित्र

पुणे : ग्रामीण पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार तसेच मोक्काच्या गुन्ह्यात कारागृहातून बाहेर आलेल्या कुख्यात गुन्हेगाराला बेकायदेशीर पिस्तुलासह गुन्हे शाखेच्या युनिट दोनने जेरबंद केले. त्याच्याकडून एक पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त केले आहे. 

हेमंत उर्फ बबलू प्रताप धुमाळ (वय २६, रा. सांगवी. ता. बारामती) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात बेकायदा शस्त्र बाळगल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

शहरातील वाढत्या गुन्ह्यांना पायबंद घालण्यासाठी गुन्हे शाखेकडून गस्त घालण्यावर भर दिला जात आहे. स्वारगेट परिसरातील पुरंदर कॉम्पलेक्सशेजारील भिंतीलगत एकजण उभा असून, त्याच्याकडे पिस्तूल असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. सहाय्यक आयुक्त गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक क्रांतीकुमार पाटील आणि पथकाने या ठिकाणी सापळा रचून त्याला पकडले. झडती घेतली असता त्याच्याकडे एक देशी बनावटीचे पिस्तूल व एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. त्यानुसार त्याला अटक केली. चौकशीत तो ग्रामीण पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे समोर आले. त्याच्यावर १६ गुन्हे दाखल आहेत. तर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे. तो मोक्कामधून बाहेर आला असल्याचे सांगण्यात आले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Notorious criminal arrested by pune crime branch with an illegal pistol pune print news zws

Next Story
पुणे : सातव्या मजल्यावरुन पडून कामगाराचा मृत्यू
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी