scorecardresearch

धक्कादायक…येरवडा कारागृहातून कैद्याचे पलायन

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २००८ मध्ये वारजे माळवाडी येथील एका व्यक्तिचा आशिष जाधव याने खून केला होता. त्या प्रकरणी आरोपी आशिष जाधव येरवडा कारागृहात शिक्षा भोगत होता.

Notorious, gangster, escaped, Yerawada Jail, pune
धक्कादायक…येरवडा कारागृहातून कैद्याचे पलायन

पुणे : पुण्यातील येरवडा कारागृहाची सर्व सुरक्षा भेदत एका कैद्याने पलायन केल्याने एकच खळबळ उडाली आहे. आशिष जाधव असं या कैद्याचे नाव असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांच्या टीम रवाना झाल्या आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २००८ मध्ये वारजे माळवाडी येथील एका व्यक्तिचा आशिष जाधव याने खून केला होता. त्या प्रकरणी आरोपी आशिष जाधव येरवडा कारागृहात शिक्षा भोगत होता. पण दरम्यानच्या काळातील आशिष जाधव याचे कारागृहातील वर्तन पाहून रेशन विभागात काम देण्यात आले होते.

Santacruz murder case
सांताक्रुझ हत्येप्रकरणी आरोपीला अटक, गुन्हे शाखेची कारवाई
victim girl was raped by her brother
अल्पवयीन पीडितेचा अमानवीय छळ प्रकरण: ‘त्या’ मुलीवर सख्ख्या भावानेही केला बलात्कार
Vijay Wadettiwar say that municipal corruption is a pasture
महापालिका भ्रष्टाचाराचे कुरण, वडेट्टीवार असे का म्हणाले…
Chandrashekhar Bawankule (1)
पत्रकारांना सांभाळण्याच्या बावनकुळेंच्या वक्तव्यावरून वाद

हेही वाचा… Maharashtra News Live : “आदित्य ठाकरे आणि नरेंद्र मोदींचा ब्रँड एकच”, भाजपाने शेअर केलेल्या फोटोवर संजय राऊतांची प्रतिक्रिया

काल दुपारच्या सुमारास सर्व कैद्याची मोजणी करण्यात आली. त्यावेळी त्यामध्ये आरोपी आशिष जाधव दिसून आला नाही. त्यावर कारागृहातील सर्व ठिकाणी पाहिले असता आरोपी आशिष जाधव दिसून आला नाही. तो पळून गेल्याच निश्चित झाल्यावर आरोपीच्या शोधासाठी टीम रवाना करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Notorious gangster escaped from yerawada jail pune svk 88 asj

First published on: 21-11-2023 at 11:55 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×