पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. यावरून राज्यात टीकेची झोड उठली आहे. विरोधक आक्रमक झाले असून आंदोलन केले जात आहेत. आज चंद्रकांत पाटील हे पिंपरी- चिंचवड दौऱ्यावर असताना पुणे जिल्हा विद्यार्थी काँग्रेस NSUI च्या वतीने त्यांना चिंचवड येथे काळे झेंडे दाखवण्यात आले आहे. तसेच, ताफा अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्या कार्यकर्त्यांना पिंपरी- चिंचवड पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. 

महापुरुषांबद्दल केलेल्या बदनामीकारक वक्तव्याबद्दल आज महाराष्ट्र राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना महाराष्ट्र प्रदेश आणि पुणे जिल्हा विद्यार्थी काँग्रेस NSUI च्या वतीने काळे झेंडे दाखवून त्यांचा ताफा आडवण्याचा चिंचवड स्टेशन येथे प्रयत्न करण्यात आला. चंद्रकांत पाटील यांनी नुकतेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. यामुळं अवघ्या राज्यात विरोधक, बहुजन समाजातील नेते आक्रमक झाले असून आंदोलन करत आहेत. आज चंद्रकांत पाटील हे पिंपरी- चिंचवड दौऱ्यावर असून त्यादरम्यान त्यांचा ताफा अडवून काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न झाला आहे. या प्रकरणी महाराष्ट्र प्रदेश आणि पुणे जिल्हा विद्यार्थी काँग्रेस NSUI च्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याच सांगितलं जात आहे. पिंपरी- चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

INDIA parties project unity at rally in Ranchi
आघाडीत राहिल्यामुळेच सोरेन तुरुंगात; ‘इंडिया’च्या सभेत खरगे यांचा आरोप
A proposal that Chhagan Bhujbal should contest elections from Nashik from BJP
‘कमळ’वर लढण्याचा भुजबळ यांना प्रस्ताव? ओबीसी मतपेढीसाठी भाजप पक्षश्रेष्ठींची खेळी
Rameshwar Cafe Bomb blast
Bengaluru: रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणी भाजपा कार्यकर्त्याला अटक, संशयितांशी संबंध असल्याचा दावा
Hyderabad Inter-Faith Couple Attacked By Muslim
हैदराबादमध्ये आंतरधर्मीय जोडप्यावर हल्ला, VIDEO व्हायरल झाल्यानंतर पोलिसांकडून कारवाई, ४ जण गजाआड