पुणे : एमआयटी विश्वशांती विद्यापीठातर्फे  बुधवारी झालेल्या परिषदेत मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी आरोपी असलेल्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकू र यांना निमंत्रित के ल्याबाबत आक्षेप घेण्यात आला. साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना निमंत्रित करून एमआयटीला नेमके  काय साध्य करायचे आहे, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला.

एमआयटी विश्वशांती विद्यापीठाच्या एमआयटी स्कू ल ऑफ गव्हर्नमेंटतर्फे  ‘वसाहतवादी मानसिकता बदलताना’ या विषयावर ऑनलाइन परिषदेचे बुधवारी आयोजन करण्यात आले. या परिषदेतील वेगवेगळ्या सत्रांसाठी माजी खासदार डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांच्यासह असलेल्या विविध वक्त्यांमध्ये ठाकू र यांचाही समावेश होता.

शैक्षणिक संस्थांनी संविधानिक विचारांचे केंद्र होणे अपेक्षित आहे. मात्र मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी असलेल्या, सामाजिक तेढ निर्माण करणारी, विखारी वक्तव्ये करणाऱ्या साध्वी प्रज्ञासिंह ठाकू र यांनी एमआयटी स्कू ल ऑफ गव्हर्नमेंटच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे हा गंभीर प्रकार आहे. त्यांची पार्श्वभूमी माहीत असताना त्यांना निमंत्रित करून एमआयटीला नेमके  काय साध्य करायचे आहे, असा सवाल स्टुडंट हेल्पिंग हँडचे कु लदीप आंबेकर यांनी उपस्थित के ला.  या संदर्भात एमआयटी प्रशासनाशी संपर्क  साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

इंग्रजी शिक्षणामुळे गुलामीची मानसिकता

हिंदुत्वामध्ये वसुधैव कुटुंबकम हा विचार आहे. मात्र हिंदुत्व आणि भगव्याला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. इंग्रजी शिक्षण, व्यवहारामुळे गुलामीची मानसिकता निर्माण होते. आपल्या धर्मामध्ये कामानुसार असलेल्या जातींमध्ये इंग्रजांनी फूट पाडून देशातील हिंदूंना विभाजित करून शासन केले. हिंदू एक झाले असते, तर भारतावर कोणीही राज्य करू शकले नसते. आपल्या पिढीला सुधारण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. देशविरोधी विचारधारेविरोधात कारवाई करणे गरजेचे असल्याचे खासदार साध्वीप्रज्ञासिंह ठाकूर यांनी भाषणात सांगितले.