पुणे : आगामी महापालिका निवडणुकीसाठी महापालिकेने केलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर तब्बल ३ हजार ५९६ हरकती-सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्यापैकी सोमवारी शेवटच्या दिवशी २ हजार ८०४ हरकती-सूचना देण्यात आल्या असून या हरकती-सूचनांवर येत्या काही दिवसांत सुनावणी होईल. हडपसर विधानसभा मतदार संघातून शेवटच्या दिवशी सर्वाधिक हरकती प्राप्त झाल्या आहेत. राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार महापालिकेच्या निवडणूक शाखेने १ फेब्रुवारी रोजी प्रारूप प्रभाग रचना आराखडा जाहीर केला होता. त्यानंतर त्यावर हरकती-सूचना मागविण्याचा प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. त्याची मुदत सोमवारी दुपारी तीन वाजता संपली. निवडणुकीसाठी इच्छुक नगरसेवक, विद्यमान नगरसेवकांबरोबरच, राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी त्यावर हरकती-सूचना नोंदविल्या आहेत. नैसर्गिक हद्द लक्षात न घेता प्रभाग रचना करण्यात आली आहे, लोकसंख्येच्या निकषाचे पालन झालेले नाही. प्रभाग रचना करताना समानता दिसत नाही, सोसायटय़ांचे भाग तोडण्यात आले आहेत, असे आक्षेप हरकती-सूचनांद्वारे नोंदविण्यात आल्याची माहिती निवडणूक शाखेकडून देण्यात आली.

प्रभागाची सीमा एक फेब्रुवारी रोजी जाहीर झाल्यानंतर याच दिवसापासून १४ फेब्रुवारीपर्यंत प्रारूप प्रभाग रचना आराखडय़ावर हरकती-सूचनांसाठी मुदत देण्यात आली होती. निवडणूक शाखेला प्राप्त झालेल्या हरकती-सूचना १६ फेब्रुवारी रोजी राज्य निवडणूक आयोगाला सादर केल्या जातील. त्यासाठी यशदाचे महासंचालक एस. चोक्किलगम यांची सुनावणी प्रक्रियेसाठी नियुक्ती करण्यात आली आहे.  राज्य निवडणूक आयोगाने प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यामार्फत हरकती आणि सूचनांवर २६ फेब्रुवारी रोजी सुनावणी घेतली जाईल. सुनावणीनंतर प्राधिकृत अधिकाऱ्यांनी केलेल्या शिफारशींबाबतचे विवरणपत्र राज्य निवडणूक आयोगाला २ मार्च रोजी पाठविण्यात येणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रभागाचा अंतिम आराखडा जाहीर केला जाईल.

Shindesena, thane,
शिंदेसेनेचे ठाण्यात पुन्हा एकदा शक्तिप्रदर्शन
narendra modi
पंतप्रधानांकडून प्रचारात जुनेच मुद्दे; विरोधकांची टीका, मित्रपक्षांचीही भिस्त मोदींवरच
What is the income of BJP candidate Anup Dhotre from Akola
अकोल्यातील भाजप उमेदवार अनुप धोत्रेंचे उत्पन्न किती? जाणून घ्या सविस्तर…
wealthy MP Bhandara
मागासलेल्या भंडाऱ्याचे श्रीमंत खासदार, मेंढे दाम्पत्याकडे १०१ कोटींहून अधिक संपत्ती…

हडपसरमधून सर्वाधिक हरकती-सूचना

हडपसर विधानसभा मतदार संघाअंतर्गत वानवडी-रामटेकडी क्षेत्रीय कार्यालयाकडे १ हजार ३४ तर धनकवडी-सहकारनगर क्षेत्रीय कार्यलयाअंतर्गत २८९  हरकती-सूचना देण्यात आल्याची माहिती निवडणूक शाखेकडून देण्यात आली. कसबा-विश्रामबागमधून २५३  हरकती देण्यात आल्या आहेत. सर्वाधिक कमी शिवाजीनगर-घोले रस्तामधून बारा तर येरवडा-कळस-धानोरीमधून पंधरा, भवानी पेठेतून २३, औंध-बाणेरमधून ३५ सूचना प्राप्त झाल्या आहेत.