पुणे : कौटुंबिक वादातून पत्नीची आक्षेपार्ह अवस्थेतील छायाचित्रे प्रसारित करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पत्नीविषयी समाजमाध्यमातील अश्लील मजकूर प्रसारित केल्या प्रकरणी एकाच्या विरुद्ध मार्केट यार्ड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.याबाबत एका ३५ वर्षीय महिलेने मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ४० वर्षीय पतीविरुद्ध माहिती-तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार महिला आणि तिचा पती मार्केट यार्ड भागात राहायला आहेत. कौटुंबिक वादातून पतीने पत्नीची आक्षेपार्ह अवस्थेतील छायाचित्रे प्रसारित केली. पत्नीविषयी अश्लील मजकूर प्रसारित केला. पोलीस उपनिरीक्षक गिरी तपास करत आहेत.आरोपी पतीने पत्नी आणि तिच्या आईला धमकावून वेळोवेळी सात लाख रुपये घेतले. पतीचे अनैंतिक संबंध असल्याचा संशय आल्याने पत्नीने त्याला जाब विचारला. तेव्हा त्याने तिला मारहाण केली.