scorecardresearch

Premium

नितेश राणे यांच्या दमदाटीच्या विरोधात अधिकारी एकवटले

‘घोडा हत्याराची भाषा माझ्याकडे नाही. मी थेट कापतो.. बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानानुसार देश चालतो मग महापालिकेत खुर्च्या गरम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी कामे करावे. त्यांची खुर्ची खेचायला वेळ लागणार नाही..

Nitesh-Rane-1
नितेश राणे

अविनाश कवठेकर

पुणे : ‘घोडा हत्याराची भाषा माझ्याकडे नाही. मी थेट कापतो.. बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानानुसार देश चालतो मग महापालिकेत खुर्च्या गरम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी कामे करावे. त्यांची खुर्ची खेचायला वेळ लागणार नाही.. अधिकाऱ्यांना कळायला हवे की, ते त्या खुर्चीवर का बसले आहेत. आम्ही कायदा हातात घेतला तर अधिकारी सुजून बाहेर पडतील’..ही मुक्ताफळे आमदार नितेश राणे यांनी उधळल्याने पुणे महापालिकेतील अधिकारी आणि राणे यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे. राणे यांनी अधिकाऱ्यांना दम देतानाच दोन समाजात तेढ निर्माण होईल, अशी विधाने केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी अधिकाऱ्यांनी केल्याने हा संघर्ष आणखी पेटणार आहे.

Sharad Pawar pimpri chinchwad
पक्षातील फुटीनंतर शरद पवार पहिल्यांदाच अजितदादांच्या बालेकिल्यात; कार्यकर्त्यांकडून जोरदार स्वागत
Pankaja Munde Narendra Modi
“हा तुमचा पक्षाला इशारा आहे का?”, पंकजा मुंडे स्पष्टच म्हणाल्या, “मी त्यांना…”
rahul narvekar supreme court uddhav thackeray eknath shinde
बंडखोरांच्या अपात्रतेबाबतच्या घडामोडींना वेग, दिल्लीतील भेटीगाठीवर राहुल नार्वेकर म्हणाले…
Sanjay Raut
“मनोज जरांगेंशी अधिकृत चर्चा व्हावी, एजंटच्या…”, संजय राऊतांची टीका; म्हणाले, “बिनकामाचे नेते…”

या संघर्षांला पुण्येश्वर मंदिराच्या जागेवर झालेले अतिक्रमण कारणीभूत ठरले आहे. बांधकामास बंदी असतानाही पुण्येश्वरमंदिराच्या जागेवर अतिक्रमण करण्यात आल्याचा आरोप करून पुण्येश्वर निर्माण समितीतर्फे पुणे महापालिकेवर मोर्चा काढून आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व करताना आमदार नितेश राणे आणि भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी अधिकाऱ्यांना केलेली दमदाटी आणि वैयक्तिक पातळीवर केलेली टीका यामुळे आमदार विरोधात अधिकारी असा संघर्ष झाला. नितेश राणे यांनी अधिकाऱ्यांना दम देतानाच दोन समाजात तेढ निर्माण होईल, अशी विधाने केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणीही सुरू झाली आहे.

हेही वाचा >>> दंगलीनंतर साताऱ्यात तणाव; एकाचा मृत्यू, दहा जखमी, घरे, दुकानांसह प्रार्थनास्थळाचीही जाळपोळ

‘बाबरीची एक वीट पाडावी, अशी माझी इच्छा होती. पण त्या वेळी शक्य झाले नाही. आता पुणे महापालिका प्रशासन मला ती संधी देईल. या वेळी आपल्यावर खटले दाखल होणार नाहीत. कारण सरकार आपले आहे. आम्ही काही केले तरी खटले दाखल होणार नाही. ज्या दिवशी तारीख जाहीर होईल, त्यादिवशी कोणालाही दूरध्वनी करायचा नाही. विचारायचे नाही. थेट कार्यक्रम करायचा. विक्रम कुमार तुम्ही माझ्या जंगलातून इथे आलात. आता यापुढे फक्त तारीख जाहीर होईल. कोणीही धार्मिक स्थळाकडे वाकडय़ा नजरेने पाहिले तर दोन पायावर जाणार नाही’ अशी विधाने आमदार राणे यांनी करत अधिकाऱ्यांना मारहाण करण्याची तसेच दमदाटीची भाषा केली.

हेही वाचा >>> पंकजा यांच्या स्वागतासाठी सोलापूरमध्ये फडणवीस समर्थकच आघाडीवर

राणे यांनी महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांच्या दालनात जाऊन थेट धमकीच दिली. या प्रकारानंतर महापालिका अधिकाऱ्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारत राणे यांना जशास तसे उत्तर दिले. राणे यांनी अधिकाऱ्यांना धमक्या देऊ नयेत.  नेत्यांची दादागिरी येथे चालणार नाही. शब्द जपून वापरा, अधिकारी आणि कर्मचारी रस्त्यावर उतरले तर काय होईल हे पाहा, असा इशाराच अधिकाऱ्यांनी एकत्रित येत राणे यांना दिल्याने हा संघर्ष शिगेला पोहोचला आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Officials united against nitesh rane statement in the municipal corporation officers should do the work ysh

First published on: 12-09-2023 at 02:57 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×