२०१८ च्या निकालात गैरव्यवहार; तत्कालीन आयुक्त अटकेत 

पुणे : शिक्षक पात्रता परीक्षा गैरव्यवहार (टीईटी) प्रकरणाचा सखोल तपास सुरू असताना या परीक्षेतील २०१८ च्या निकालात घोटाळा झाल्याचे उजेडात आले आहे. या प्रकरणात राज्य परीक्षा परिषदेचे तत्कालीन आयुक्त सुखदेव डेरे तसेच परीक्षा घेणाऱ्या जी. ए. सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीसचा तत्कालीन व्यवस्थापक सामील झाल्याची धक्कादायक माहिती तपासात मिळाली असून दोघांना पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने मंगळवारी अटक केली. परीक्षेतील निकालासाठी ५०० अपात्र परीक्षार्थींकडून प्रत्येकी ५० ते ६० हजार रुपये घेण्यात आल्याचे उघड झाले आहे. 

Baramati Namo Maharojgar Melava
निमंत्रण पत्रिकेतील आणखी एक घोळ सुधारण्यासाठी प्रशासनाची धावाधाव
10th exam maharashtra
राज्यात दहावीची परीक्षा सुरू, पहिल्या दिवशी कॉपी प्रकरणे किती?
baramati mp supriya sule talk regarding anonymous letter on social media
निनावी पत्राबाबत माहिती नाही! सुप्रिया सुळे यांचे स्पष्टीकरण
A case has been registered against the scribes in the city police station for embezzlement of examination fees by the scribes of Miraj High School
लेखनिकाने केला अपहार, ३५८ विद्यार्थी मात्र निकालापासून वंचित

   या प्रकरणी सुखदेव हरी डेरे (वय ६१) तसेच जी. ए. सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीसचा संचालक अश्विनीकुमार (वय ४९, कर्नाटक) यांना अटक करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम नामदेव सुपे यांच्यासह शिक्षण विभागातील तांत्रिक सल्लागार अभिषेक सावरीकर तसेच संजय शाहूराव सानप यांना अटक करण्यात आली असून महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष दत्तात्रय जगताप यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत दिली.

शिक्षक पात्रता परीक्षा गैरव्यवहार प्रकरणाची व्याप्ती राज्यभरात पसरली असून ही परीक्षा घेण्याची जबाबदारी बंगळूरुतील जी. ए. सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीस कंपनीकडे सोपविण्यात आली होती. सखोल चौकशीत शिक्षक पात्रता परीक्षा २०१८ च्या निकालातही गैरव्यवहार झाल्याचे उघड झाले. राज्य परीक्षा परिषदेचे तत्कालीन आयुक्त सुखदेव डेरे तसेच अश्विनीकुमार या गैरव्यवहारात सामील असल्याचे उघडकीस आल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली, असे गुप्ता यांनी सांगितले. 

शासनाची फसवणूक…

शिक्षक पात्रता परीक्षा गैरव्यवहारात अटकेत असलेला आरोपी संजय सानप तसेच अनेक दलाल परीक्षार्थींच्या संपर्कात होते. त्यांच्याकडून पैसे घेण्यात आले. या प्रकरणात काही शिकवणीचालक सामील आहेत. परीक्षार्थींकडून आधीच उत्तरपत्रिका लिहून घेण्यात आल्या. राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर आरोपींचे नियंत्रण असल्याने खोटा निकाल जाहीर करण्यात आला. मूळ निकालाच्या यादीत अपात्र उमेदवारांची नावे समाविष्ट करण्यात आली. प्रामाणिक परीक्षार्थी तसेच शासनाची आरोपींनी फसवणूक केली आदी गैरव्यवहार झाल्याचे दिसून आले आहे.

नवे काय?

अपात्र परीक्षार्थींना पात्र करण्यासाठी आरोपींनी निकालात फेरफार केला. या गैरव्यवहार प्रकरणाची व्याप्ती राज्यभरात पसरली असून दलालांची साखळी गैरव्यवहार प्रकरणात सहभागी असल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

५०० परीक्षार्थींकडून पैसे

शिक्षक पात्रता परीक्षेत उत्तीर्ण करण्यासाठी आतापर्यंत ५०० परीक्षार्थींनी दलांलांमार्फत तुकाराम सुपे, सुखदेव डेरे यांना प्रत्येकी ५० ते ६० हजार रुपये दिल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पाच कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम गैरव्यवहारातून जमा झाली असून आरोपींनी रक्कम वाटून घेतली आहे.

अप्पर मुख्य सचिवांमार्फत चौकशी

मुंबई : सध्या राज्यभर गाजत असलेल्या महाराष्ट्र राज्य परीक्षा  परिषदेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या शिक्षक चाचणी परीक्षेतील (टीईटी) घोटाळ्याची चौकशी शालेय शिक्षण विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीमार्फत करण्यात येणार आहे.

शिक्षक पात्रता परीक्षा गैरव्यवहाराची व्याप्ती राज्यभरात पसरली असून या प्रकरणात आणखी काही महत्त्वाचे धागेदोरे मिळाले आहेत. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. या प्रकरणात आणखी काहीजणांना अटक होऊ शकते.

– अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त, पुणे