जी-२० परिषदेच्या निमित्ताने वीस लाख रुपयांची उधळपट्टी करून १०० कृत्रिम झाडे भाडेकराराने घेण्याच्या निर्णयावर चोहोबाजून टीका झाल्यानंतर महापालिकेने हा निर्णय स्थगित केला आहे. शंभर कृत्रिम झाडे घेण्याऐवजी या प्रकारची दहा झाडे कंपन्यांच्या सामाजिक उत्तरदायित्व (सीएसआर) निधीतून घेण्यात येणार आहेत. त्यामुळे वीस लाखांच्या उधळपट्टीला लगाम लागला आहे.

हेही वाचा >>>“उपमुख्यमंत्र्यांची बायको डोक्यात थोडी कमी आहे का?” रुपाली ठोंबरे संतापून म्हणाल्या, “देवेंद्र फडणवीसांनी अमृता मामीला ठणकावून…”

akola, after 3 months of victim death, Murder Case Registered, Akot Police Sub Inspector, murder case in akola, murder case, victim death, victim torture by police, crime news, akola news, marathi news,
पोलिसाच्या अमानुष मारहाणीत आरोपीचा मृत्यू; तीन महिन्यांनी गुन्हा दाखल
nagpur, rape victim girl missing, police started search operation, rape victim girl in nagpur, crime in nagpur, crime news, nagpur news, marathi news,
न्यायालयात गोंधळ घालणारी युवती अचानक बेपत्ता
Slum cleaning contract
झोपडपट्टी स्वच्छता कंत्राट : चौथ्यांदा मुदतवाढीची नामुष्की, १५ एप्रिलला न्यायालयात सुनावणी
fraud with 628 investors
गुंतवणुकीच्या नावाखाली ६२८ गुंतवणूकदारांची ५७९ कोटींची फसवणूक, आरोपी सनदी लेखापालाला ८ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

शहरात जानेवारी महिन्यात जी-२० परिषद होणार आहे. या परिषदेसाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. या परिषदेच्या निमित्ताने सुशोभीकरणावर महापालिकेने भर दिला असून साठ चौकांच्या सुशोभीकरणाबरोबरच रस्ते दुरुस्ती करण्यात येणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून सुशोभीकरण आणि विद्युत रोषणाईच्या नावाखाली वीस लाख रुपये खर्च करून शंभर कृत्रिम झाडे भाडेकराराने घेण्याचा निर्णय महापालिकेच्या विद्युत विभागाने घेतला होता. मात्र या निर्णयावरून महापालिकेवर टीका करण्यात आली होती.

हेही वाचा >>>पुणे: केंद्र, राज्य शासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत निर्णय घ्यावा; ‘आयएमए’चे आवाहन

शहरातील प्रमुख रस्ते, चौकात विद्युत रोषणाई करण्याची जबाबदारी महापालिकेच्या विद्युत विभागाकडे आहे. त्यामध्ये आठ दिवसांसाठी शंभर कृत्रिम झाडे भाडेकराराने घेऊन ती झाडे विमानतळ ते सेनापती बापट रस्त्यावर ठेवण्याचे नियोजित होते. या प्रत्येक झाडासाठी सुमारे २० हजार रुपये भाडे महापालिका देणार होती. पण या कृत्रिम झाडांपेक्षा खऱ्या झाडांचे संवर्धन करा, पैशाची उधळपट्टी थांबवा अशी मागणी करत काही संस्था आणि संघटनांनी आयुक्त, प्रशासक विक्रम कुमार यांच्याकडे तक्रार केली होती. त्यामुळे हा निर्णयाला स्थगिती देण्याचा आदेश आयुक्तांनी विद्युत विभागाला दिला आहे.

‘जी २०’ परिषदेनिमित्ताने १०० कृत्रिम लायटिंगची झाडे भाड्याने घेतली जाणार होती. पण आता १० झाडे लावली जाणार आहेत. आयुक्तांकडे याबाबत तक्रारी आल्याने हे आदेश दिले आहेत. या १० झाडांपैकी काही झाडे सीएसआरमधून घेण्यात येतील, असे विद्युत विभागाचे प्रमुख श्रीनिवास कंदूल यांनी सांगितले.