scorecardresearch

Premium

पिंपरी महापालिकेच्या करसंवादात प्रश्नांचा जागेवरच निपटारा

करदात्यांच्या मालमत्ताकराबाबत शंका, प्रश्न व अडचणींचा निपटारा करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने सुरू केलेल्या ‘करसंवाद’ला नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे.

Pimpri Municipal Corporations tax communication
नागरिकांच्या प्रश्नांचा जागेवरच निपटारा करण्यात आला.(फोटो सौजन्य- प्रातिनिधिक छायाचित्र)

लोकसत्ता प्रतिनिधी

पिंपरी : करदात्यांच्या मालमत्ताकराबाबत शंका, प्रश्न व अडचणींचा निपटारा करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने सुरू केलेल्या ‘करसंवाद’ला नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे. करदात्यांना जूनअखेरच्या सवलतींची माहिती मिळण्यासाठी आयोजित केलेल्या करसंवादात करदात्यांनी ‘ऑनलाइन’ व ‘ऑफलाइन’ पद्धतीने सहभाग घेतला. नागरिकांच्या प्रश्नांचा जागेवरच निपटारा करण्यात आला.

Prime Minister Modi firm assertion that the scheme is for the benefit of farmers
योजना शेतकरी हिताच्याच! पंतप्रधान मोदी यांचे ठाम प्रतिपादन
Nikhil Wagle
ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावरील हल्ल्याचा विविध स्तरांतून निषेध
The black paper released by the Congress on Thursday criticized the bjp
१० वर्षांत ४११ आमदारांची फोडाफोडी; काँग्रेसच्या काळय़ापत्रिकेत भाजपवर टीकास्त्र
Meeting started in Nagpur on the issue of contract electricity workers
कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर नागपुरात बैठक सुरू

करदात्यांचे प्रश्न ऐकून त्यावर तातडीचा निपटारा, निरसन करून त्याबाबत अधिकाऱ्यांना आदेश देऊन नागरिकांचा विभागाबाबत विश्वास निर्माण करण्याचे काम ‘करसंवाद’ उपक्रमाने केले आहे. नुकत्याच झालेल्या करसंवादमध्ये ४० पेक्षा जास्त नागरिकांनी ऑनलाइन व ३० पेक्षा जास्त नागरिकांनी विभागामध्ये येऊन विचारलेल्या प्रश्नाचे करसंकलन विभागाचे सहाय्यक आयुक्त नीलेश देशमुख यांनी निरसन केले.

आणखी वाचा- पिंपरीतील ५२ ‘रूफ टॉप’ हॉटेल रडारवर

उपयोगकर्ता शुल्क कशासाठी ?अवैध बांधकाम शास्ती समायोजन कधीपासून? सामान्य करातील सवलती कोणाला व किती? विलंब शुल्क कधी पासून? अशा अनेक प्रश्नांचे निरसन करण्यात आले. त्याचबरोबर नागरिकांनी दिलेल्या सूचनांची नोंद घेऊन त्याबाबत अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले.

‘ऑनलाइन’ माध्यमातून सहभागी झालेल्या प्रत्येक प्रश्नास देशमुख यांनी उत्तर देताना, सामान्य करात आगाऊ भरणा केल्यास पाच टक्के, ‘ऑनलाइन’ कराचा भरणा केल्यास पाच टक्के, महिलांच्या नावे असणाऱ्या एका निवासी मालमत्तेस ३० टक्के, दिव्यांग ५० टक्के, माजी सैनिकांना १०० टक्के, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, खत निर्मिती यंत्रणा असलेल्या सोसायट्यांना पाच टक्के या सवलती असून, जूनअखेर मालमत्ताकराचा भरणा करण्याचे आवाहनही केले.

आणखी वाचा-पुणे: कर्नाटकातील तोतया लष्करी अधिकारी पोलिसांच्या जाळ्यात

प्रतिमहा दोन टक्के विलंब शुल्क

‘उपयोगकर्ता शुल्क’ हे नागरिकांची पिळवणूक नसून, सरकारच्या आदेशानुसार नागरिकांना कचरा संकलन व विलगीकरण यासाठी मिळणाऱ्या सेवेसाठीचे शुल्क आहे. जूनअखेर मालमत्ताकराचा भरणा न केल्यास जप्ती मोहिमेला थकबाकीदारांना सामोरे जावे लागेल. त्याचबरोबर थकबाकीदारांना येत्या काळात प्रतिमहा दोन टक्क्यांचे विलंब शुल्क आकारण्यात येणार असल्याचेही सहाय्यक आयुक्त देशमुख यांनी सांगितले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: On the spot settlement of questions in pimpri municipal corporations tax communication pune print news ggy 03 mrj

First published on: 19-06-2023 at 13:12 IST

आजचा ई-पेपर : पुणे

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×