चिंचवडमध्ये नवव्या मजल्यावरून पडून दीड वर्षांच्या मुलीचा मृत्यू

अनिका देवरत तोमर असे या मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे.

खेळताना नवव्या मजल्यावरून पडून दीड वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाल्याची घटना चिंचवडमध्ये घडली. संध्याकाळी चारच्या सुमारास चिंचवड येथे ही घटना घडली असून अनिका देवरत तोमर असे या मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे.

चिंचवडमधील लिंक रोड येथे मेट्रोपॉलिटन वसाहतीत राहणारी अनिका तोमर ही मुलगी संध्याकाळी बाल्कनीत खेळत होती. तिचे आई, आजोबा आणि आजी घरात दुसऱ्या खोलीत होते. खेळत असताना ग्रीलवरून तोल जाऊन अनिका नवव्या मजल्यावरून खाली पडली. यात तिचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच चिंचवड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.  चिंचवड पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: One and half year girl falls from 9th floor dies in chinchwad

ताज्या बातम्या