scorecardresearch

पुणे: कोथरुड भागात गांजा विक्री एकास अटक; साडेसात किलो गांजा जप्त

कोथरुड भागात गांजा विक्रीसाठी आलेल्या एकाला अमली पदार्थ विरोधी पथकानो पकडले.

पुणे: कोथरुड भागात गांजा विक्री एकास अटक; साडेसात किलो गांजा जप्त
शंभर कोटींच्या अंमली पदार्थांची तस्करी; गुजरातमधून दोघांचा ताबा ( प्रातिनिधिक छायाचित्र )

कोथरुड भागात गांजा विक्रीसाठी आलेल्या एकाला अमली पदार्थ विरोधी पथकानो पकडले. त्याच्याकडून साडेसात किलो गांजा, दुचाकी, मोबाइल संच असा दोन लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.करणकुमार भरत राय (वय २२, रा. गुरुदत्त काॅलनी, शिवाई चौक, कर्वेनगर, मूळ रा. थाना डुमरा, जि. सीतामढी, बिहार) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

हेही वाचा >>>पुणे: शिवाजीनगर, डेक्कन परिसरात गुरुवार, रविवार वीजपुरवठा बंद

कोथरुड भागात एक जण गांजा विक्रीसाठी येणार असल्याची अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. पोलिसांनी सापळा लावून रायला पकडले. त्याच्याकडे असलेल्या पिशवीची झडती घेण्यात आली. पिशवीत साडेसात किलो गांजा सापडला. राय याच्याकडून दुचाकी, इलेक्ट्राॅनिक वजनकाटा, मोबाइल संच असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.सहायक पोलीस आयुक्त गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, सहायक निरीक्षक शैलजा जानकर, सुजीत वाडेकर, मारुती पारधी, मनोज साळुंके, राहुल जाेशी, विशाल दळवी आदींनी ही कारवाई केली.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-11-2022 at 23:10 IST

संबंधित बातम्या