पुणे:बेकायदा सावकारी प्रकरणात एकाला अटक; व्याजाने घेतलेल्या पैशांची परतफेड केल्यानंतरही धमकी | One arrested in illegal moneylending case pune print news amy 95 | Loksatta

पुणे:बेकायदा सावकारी प्रकरणात एकाला अटक; व्याजाने घेतलेल्या पैशांची परतफेड केल्यानंतरही धमकी

व्याजाने घेतलेल्या पैशाची परतफेड केल्यानंतरही धमकावणाऱ्या सावकाराला गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाकडून अटक करण्यात आली.

पुणे:बेकायदा सावकारी प्रकरणात एकाला अटक; व्याजाने घेतलेल्या पैशांची परतफेड केल्यानंतरही धमकी
प्रतिनिधिक छायाचित्र

व्याजाने घेतलेल्या पैशाची परतफेड केल्यानंतरही धमकावणाऱ्या सावकाराला गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाकडून अटक करण्यात आली. त्याच्याविरोधात विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.योगेश पंडीत भालेराव (वय २७ रा. धानोरी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत एकाने खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार अर्ज दिला होता. फिर्यादीला पैशांची गरज असल्याने त्याने भालेराव याच्याकडून दरमहा दहा टक्के व्याजाने चार लाख रुपये घेतले होते.

हेही वाचा >>>पुणे: ‘पीएमआरडीए’कडून वाल्हेकरवाडी, चिंचवडमध्ये व्यापारी गाळे उपलब्ध; ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन

त्यानंतर वेळोवेळी चार लाख ८० हजार रुपयांची परतफेड केली. त्यानंतर भालेराव यांनी फिर्यादींना शिवीगाळ करून पैशांची मागणी केली. तसेच तक्रारदाराचा टेम्पो ताब्यात घेण्याची धमकी दिली. या प्रकरणी खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार अर्ज देण्यात आला होता. तक्रार अर्जाची चौकशी करून खंडणी विरोधी पथकाने भालेराव याच्या विरोधात कारवाई केली.वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मोहनदास जाधव, श्रीकांत चव्हाण आणि पथकाने ही कारवाई केली.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-12-2022 at 15:38 IST
Next Story
पुणे:राज्यकर्ते म्हणजे रेड्यांची अवलाद; सदाभाऊ खोत यांची जीभ घसरली