One killed by a gang in Narhe area on Sinhagad Road pune | Loksatta

टोळक्याकडून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत एकाचा खून; पुण्यातील नर्‍हे भागातील घटना

घटनेनंतर पोलिसांनी जखमी सुनील नलवडे यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

टोळक्याकडून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत एकाचा खून; पुण्यातील नर्‍हे भागातील घटना
सिंहगड रोडवरील नर्‍हे परिसरात टोळक्याकडून एकाचा खून

सिंहगड रस्त्यावरील नर्‍हे येथे पाच ते सहा जणांच्या टोळक्याने लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याने एकाचा मृत्यू झाला. आर्थिक व्यवहारातून खून झाल्याचा संशय पोलसांनी व्यक्त केला आहे. सुनील राधाकिसन नलवडे (वय ५४, रा. भैरोबा नाला, फातिमानगर) असे मृत्यू पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत त्यांचा भाऊ सुदाम राधाकिसन नलवडे (वय ५७) यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. नर्‍हे येथील अभिनव कॉलेज रोडवरील विश्व रेसिडेन्सी जवळ शुक्रवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

हेही वाचा- रिक्षावर झाड कोसळून चालकाचा मृत्यू

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनील नलवडे हे पूर्वी लष्कर भागात झेरॉक्स मशीन दुरुस्तीचे काम करीत होते. शुक्रवारी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास अभिनव कॉलेज रोडवरील विश्व रेसिडेंन्सी जवळ एका चार चाकी गाडीमधून पाच ते सहा जण सुनिल नलवडे यांना घेऊन आले.  त्यानी लाथाबुक्क्यांनी त्यांना बेदम मारहाण केली. त्यात ते जखमी झाले़ पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली़. पोलिसांनी त्यांना उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल केले. पहाटे उपचार सुरु असताना त्यांचा  मृत्यू झाला.

हेही वाचा- शाळकरी मुलाचा लैगिंक छळ; माजी मुख्याध्यापकासह तिघांवर गुन्हा दाखल

गेल्या काही वर्षांपूर्वी सुनील नलवडे यांच्या पत्नी आणि मुलाचा मृत्यु झाल्याने ते एकटेच रहात होते. झेरॉक्स मशीन दुरुस्तीचे काम ते करत होते त्यांनी काही जणांकडून कर्ज घेतल्याची माहिती मिळाली आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
नव्या मित्रांच्या भूमिकेमुळे पुण्यात शिवसेनेची फरपट

संबंधित बातम्या

‘मी स्वत:ला राज्यपाल मानत नाही’; नव्या वक्तव्यामुळे भगतसिंह कोश्यारी पुन्हा चर्चेत
पुणे: रिक्षा चालकांना आंदोलन न करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात विकासकामांच्या श्रेयवादाची लढाई
राज्यात तीस हजार टन बेदाणा शिल्लक; मागणी वाढल्यामुळे दरात वीस रुपयांपर्यंत तेजी
पुणे : नवले पुलावरील अपघात रोखण्याच्या उपाययोजनांवर आज बैठक

व्हिडिओ

ताज्या बातम्या
Team India: ‘बुमराह आणि शमीच्या पलीकडे विचार करण्याची वेळ आली आहे’, माजी निवडकर्त्याचे मोठे वक्तव्य
Video: तरुणाच्या अंगावर चढून साडी नेसलेल्या महिलेचा भन्नाट स्टंट, व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, ” नवऱ्याशिवाय…”
IND vs BAN: तिसऱ्या वनडेसाठी टीम इंडियाच्या ताफ्यात ‘चायनामन’ गोलंदाजाचा समावेश, केएल राहुलवर नेतृत्वाची जबाबदारी
मुंबई: बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी २२ हजार खारफुटीची झाडे तोडण्यास उच्च न्यायालयाची सशर्त परवानगी
“तो मर्द आहे…” अर्जुन कपूरवरुन ट्रोल करणाऱ्यांना मलायका अरोराने सुनावलं