मोटारीच्या धडकेने एकाचा मृत्यू; मद्यपी मोटारचालक अटकेत ; वारजे भागात अपघात

या प्रकरणी मोटारचालकास अटक करण्यात आली असून त्याने मद्यप्राशन केल्याचे वैद्यकीय तपासणीत उघडकीस आले आहे.

road accident
प्रतिनिधिक छायाचित्र

पुणे : मोटारीच्या धडकेने एकाचा मृत्यू झाल्याची घटना वारजे भागात घडली. या प्रकरणी मोटारचालकास अटक करण्यात आली असून त्याने मद्यप्राशन केल्याचे वैद्यकीय तपासणीत उघडकीस आले आहे.

संतोष सदाशिव जांभळे (वय ५१, रा. सखाराम चाळ, आकुर्डी) असे मृत्युमुखी पडलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी मोटाराचालक आकाश दत्तात्रय धुमाळ (वय ३०, रा. वारजे माळवाडी) याला अटक करण्यात आली आहे. प्रकाश भुवड (वय ३२, रा. जयभवानीनगर, कोथरुड) यांनी याबाबत वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. जांभळे बाहेरगावी केले होते. पहाटे तीनच्या सुमारास वारजे भागातील विनायक हॉस्पिटलसमोर ते वाहनातून सामान उतरवत होते. त्या वेळी भरधाव मोटारीने रस्त्यात थांबलेल्या जांभळे यांना धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या जांभळे यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. मोटारचालक धुमाळला पोलिसांनी ताब्यात घेतले. धुमाळने मद्यप्राशन केल्याचे वैद्यकीय चाचणीत निष्पन्न झाले असून पोलीस उपनिरीक्षक वाय. बी. पडवळे तपास करत आहेत.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: One killed in drunk driving accident driver arrested pune print news zws

Next Story
पादचाऱ्यांना धमकावून लुटमार करणाऱ्या टोळीवर मोक्कांतर्गत कारवाई करा; पोलीस आयुक्तांचे आदेश
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी