पुणे : बेकायदा बाळगलेले पिस्तूल हाताळताना झालेल्या गोळीबारात एक जण जखमी झाल्याची घटना सिंहगड रस्त्यावरील वडगाव बुद्रुक परिसरात गुरुवारी सकाळी घडली. गोळीबारात एकाच्या पायाला गोळी लागल्याने तो जखमी झाला. त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 वडगाव बुद्रुक परिसरात चरवड वस्तीत एका किराणा माल दुकानदाराने बेकायदा देशी बनावटीचे पिस्तूल बाळगले होते. गुरुवारी सकाळी पावणेआठच्या सुमारास किराणा माल दुकानदार त्याच्या मित्राला पिस्तूल दाखवित होता. पिस्तूल हाताळताना चाप ओढला गेल्याने गोळी सुटली आणि गोळी मित्राच्या पायाला चाटून गेली. सकाळी पावणेआठच्या सुमारास ही घटना घडली. गोळीबाराची माहिती मिळताच सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेतली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी करण्यात आली.गोळीबारात एकाच्या पायाला गोळी चाटून गेली आहे. गोळीबार नेमका कसा झाला, याची माहिती घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक कुंभार यांनी दिली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: One person injured in firing while handling illegally possessed pistol pune print news rbk 25 amy
Show comments