scorecardresearch

पुणे: वारजेमध्ये सराईत गुन्हेगाराकडून गोळीबार

गोळीबाराची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून आरोपीचा शोध घेण्यात येत आहे.

पुणे: वारजेमध्ये सराईत गुन्हेगाराकडून गोळीबार
प्रातिनिधिक छायाचित्र /लोकसत्ता

वारजे येथील रामनगर भागात गुंडाने एकावर गोळीबार केल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. या घटनेमुळे खळबळ उडाली. गोळीबाराची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून आरोपीचा शोध घेण्यात येत आहे. कार्तिक इंगवले असे गुंडाचे नाव आहे. इंगवले हा सराईत गुन्हेगार आहे. नुकताच तो मोक्का कारवाईतून कारागृहातूनबाहेर आला होता.

त्यांनतर पुन्हा त्याने दहशत करण्यास सुरवात केली. शुक्रवारी रात्री इंगवले याने दुचाकीवरून जात असताना पाठीमागील दुचाकीस्वारावर गोळीबार केला. यामुळे एकच खळबळ उडाली. या घटनेत कुणीही जखमी नाही. घटनेची माहिती मिळताच वारजे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीचा शोध सुरू केला आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 17-12-2022 at 10:20 IST

संबंधित बातम्या