scorecardresearch

दिल्लीतून २९ किलो सोने लंपास करून पळालेल्या चोरट्यास चिंचवडमधून अटक

पोलिसांनी सखोल चौकशी केली असता त्याच्याकडे रोख दोन लाख रूपये सापडले.

anuj gupta, crime
दिल्ली पोलिसांनी पिंपरी पोलीस ठाण्याच्या मदतीने चिंचवड येथील कामाक्षी हॉटेलमधून आरोपी अनुज गुप्ताला ताब्यात घेतले.

दिल्लीतून २९ किलो सोने घेऊन पसार झालेल्या चोरट्यास चिंचवड येथून अटक करण्यात आली. अनुज विनोदकुमार गुप्ता (रिंकू अगरवाल) (वय ३७, रा. बायस गल्ली, मेन बाजार, बहादूरगड, जि. झझर, हरियाणा) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव असून दिल्ली पोलीस व पिंपरी पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने त्याला चिंचवड येथील एका लॉजमधून ताब्यात घेतले.
अनुज गुप्ता याने दिल्लीतील अनकुलदास नरेंद्रनाथदास यांच्या घरातील व इतर नऊ ज्वेलर्स दुकानातील सुमारे २९ किलो सोने लंपास केले होते. याप्रकरणी दिल्ली पोलीस गुप्ताचा शोध घेत असताना तो चिंचवड येथील एका लॉजमध्ये असल्याचे त्यांना कळले. यावरून दिल्ली पोलिसांनी पिंपरी पोलीस ठाण्याच्या मदतीने चिंचवड येथील कामाक्षी हॉटेलमधून त्याला ताब्यात घेतले. यावेळी त्याच्यासोबत पत्नी व दोन मुलेही होते. त्याने हॉटेलची रूम पत्नीच्या नावे बुक केली होती.
पोलिसांनी सखोल चौकशी केली असता त्याच्याकडे रोख दोन लाख रूपये सापडले. तीन ते चार किलो सोने त्याने बँकेच्या लॉकरमध्ये ठेवल्याचे सांगितले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 17-09-2016 at 15:20 IST