आगामी महापालिका निवडणुकीचे रणशिंग वाजले; राज्य निवडणूक आयोगाकडून प्रारूप प्रभाग रचना करण्याचे आदेश

पुणे : महापालिके च्या आगामी निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना तयार करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिके ला दिले असून ही प्रक्रिया शुक्रवारपासून (२७ ऑगस्ट) सुरू होणार आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीचे रणशिंग वाजले असून पक्षपातळीवरील निवडणूक तयारीला या आदेशामुळे वेग येईल. ही निवडणूक ‘एक प्रभाग (वॉर्ड) – एक नगरसेवक’ या पद्धतीने होणार असल्याने तूर्तास एक प्रभाग दोन नगरसेवक हा मुद्याला पूर्णविराम मिळाला आहे.

पुणे, पिंपरी-चिंचवड सह राज्यातील अठरा महापालिकांची मुदत फे ब्रुवारी २०२२ मध्ये संपुष्टात येणार आहे. त्या दृष्टीने राज्य निवडणूक आयोगाने आगामी निवडणुकांकरिता प्रारूप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्यासंदर्भातील आदेश महापालिकांना दिले आहेत.

narendra modi
पंतप्रधानांकडून प्रचारात जुनेच मुद्दे; विरोधकांची टीका, मित्रपक्षांचीही भिस्त मोदींवरच
BJP, Jats, Thakurs, anger of the Jats ,
पहिल्या टप्प्यामध्ये भाजपला जाट, ठाकुरांच्या रागाची धास्ती
appointment of nurses in the municipal hospital was stopped due to the code of conduct
मुंबई : आचारसंहितेमुळे महानगरपालिका रुग्णालयातील परिचारिकांची नियुक्ती रखडली
Congress, shetkari kamgar paksh
रायगडमधील पारंपरिक प्रतिस्पर्धी निवडणुकीच्या आखाड्यापासून दूर

महाराष्ट्र महानगरपालिका (सुधारणा) अधिनियम, २०१९ अन्वये सर्व महापालिकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीऐवजी एक सदस्यीय प्रभाग पद्धती लागू करण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्येक प्रभाग एक सदस्याचा असेल. प्रभाग निश्चित करताना सन २०११ ची लोकसंख्या विचारात घेतली जाणार आहे. त्या दृष्टीने प्रारूप प्रभाग रचना आराखडा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

महापलिकेची सन २०१७ मधील निवडणूक चार नगरसेवकांचा एक प्रभाग या पद्धतीने झाली होती. यामध्ये भारतीय जनता पक्षाला मोठे यश मिळाले होते. महाविकास आघाडीने ३१ डिसेंबर २०१९ रोजी बहुसदस्यीय पद्धत बंद करून एक प्रभाग एक नगरसेवक असा ठराव मंजूर के ला होता. मात्र मुंबईसाठी फक्त एक नगरसेवक एक प्रभाग ही पद्धत ठेवावी आणि अन्य महापालिकांमध्ये दोन नगरसेवकांचा एक प्रभाग असावा, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसने घेतली होती. त्यावरून महाविकास आघाडीतील मतभेदही पुढे आले होते. मात्र राज्य निवडणूक आयोगाने एक प्रभाग एक नगरसेवक या पद्धतीचे आदेश काढल्याने तूर्तास वादाच्या या मुद्द्याला पूर्णविराम मिळाला आहे.

सन २०११ ची लोकसंख्या विचारात घेऊन मतदारसंख्या निश्चित करण्यात यावी, मतदार याद्या तयार करण्यात याव्यात, असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे. तसेच अंतिम प्रभाग रचना, आरक्षण आणि सोडतीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाकडून नंतर जाहीर के ला जाणार आहे. निवडणूक आयोगाच्या या आदेशाने पक्षस्तरावरील निवडणूक प्रक्रियेला गती मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

एक प्रभाग २१ हजार लोकसंख्येचा

शहराची एकू ण लोकसंख्या भागिले महापालिके ची एकू ण सदस्य संख्या या सूत्राने प्रथम प्रभागाची लोकसंख्या निश्चित करण्यात येणार आहे. प्रभागाची लोकसंख्या त्या प्रभागाच्या सरासरी लोकसंख्येच्या १० टक्के  कमी किं वा १० टक्के  जास्त या मर्यादेत ठेवता येणार आहे. सीमारेषा, मोठे रस्ते, गल्ल्या, नाले, नद्या, डोंगर, उड्डाण पूल आदी मर्यादा विचारात घेऊन प्रभाग निश्चित करण्याची आयोगाची सूचना आहे. एका इमारतीचे, चाळीचे, घराचे विभाजन दोन प्रभागात करण्यात येऊ नये, दळणवळणाच्या दृष्टीने विचार करावा, अशी सूचना करण्यात आली आहे. दरम्यान,  आदेशानुसार एक प्रभाग किमान साडेएकवीस हजार लोकसंख्येचा होण्याची शक्यता आहे.