पाळीव श्वानाला दगड मारल्याने झालेल्या वादातून एकावर कुऱ्हाडीने वार करण्यात आल्याची घटना बाणेर भागात घडली. या प्रकरणी श्वानाच्या मालकास चतु:शृंगी पोलिसांनी अटक केली. अयुब बाशा शेख (वय ३६, रा. शिंदे मळा, कपील मल्हार सोसायटीजवळ, बाणेर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. शेख याने केलेल्या हल्ल्यात रवि घोरपडे (वय ४०, रा. शिंदे मळा, कपील मल्हार सोसायटीजवळ, बाणेर) गंभीर जखमी झाला आहे.

हेही वाचा-पुणे: सिंहगड रस्ता भागात मोबाइल चोरट्यांची टोळी गजाआड

murder of girlfriend, mumbai,
मुंबई : प्रेयसीच्या हत्येप्रकरणी ३० वर्षीय व्यक्तीला अटक
Ram Navami, High Court, State Govt,
रामनवमीला खबरदारी घ्या! उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश
father beaten
वसई : मुलीचे अपहरण केल्यानंतर पित्याला बेदम मारहाण, नया नगर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा
Rashmi Barve
रश्मी बर्वे प्रकरणावर बुधवारी सुनावणी, जातवैधता प्रमाणपत्रामुळे निवडणूक अर्ज रद्द

शेख बिगारी काम करतो. घोरपडे रंगारी आहे. दोघे शिंदे मळा भागातील वस्तीत राहायला असून एकमेकांचे परिचित आहेत. घोरपडे शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास शिंदे मळा परिसरातून निघाला होता. त्यावेळी शेख याचे पाळीव श्वान घोरपडे याच्यावर भुंकले. घाेरपडेने श्वानाला दगड मारला. या कारणावरुन दोघांमध्ये वाद झाला. शेखने घोरपडे याच्यावर कुऱ्हाडीने वार केले. शेखने केलेल्या हल्ल्यात घोरपडे गंभीर जखमी झाला. खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी शेखला अटक करण्यात आली असून न्यायालयाने शेखला चार दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे तपास करत आहेत.