one way traffic at katraj ghat due to road maintenance work pune print news zws 70 | Loksatta

पुणे : डांबरीकरणाच्या कामामुळे कात्रज घाटात एकेरी वाहतूक

दुहेरी वाहतुकीमुळे वाहतूक कोंडी व अपघाताच्या शक्यता लक्षात घेऊन या उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

पुणे : डांबरीकरणाच्या कामामुळे कात्रज घाटात एकेरी वाहतूक

कात्रज-शिंदेवाडी रस्ता राज्य मार्ग क्रमांक १२६ अर्थात जुना कात्रज घाट रस्त्याच्या डांबरी पृष्ठभागाचे मजबुतीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. परिणामी ३१ डिसेंबरपर्यंत सातारा ते पुणे जुना कात्रज घाट रस्त्यावरील वाहतूक बंद करून वाहतूक नवीन बोगद्यातून पुण्याकडे वळविण्यात आली आहे. जुना कात्रज घाट रस्त्याच्या कि.मी. २२/०० ते २०/२०० या लांबीत डांबरी पृष्ठभागाचे मजबुतीकरणाचे काम सुरू आहे.

दुहेरी वाहतुकीमुळे वाहतूक कोंडी व अपघाताच्या शक्यता लक्षात घेऊन या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यानुसार ३१ डिसेंबरपर्यंत या रस्त्यावर एकेरी वाहतूक करून साताऱ्याकडून येणारी वाहतूक नवीन बोगद्यातून दरीपूल मार्गे पुण्याकडे वळविण्यात आली आहे. पुणे मोटार वाहन कायदा १९८८ चे कलम ११५ मधील तरतुदीनुसार व गृह विभागाचे १९ मे १९९० च्या अधिसूचनेनुसार जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी हे आदेश प्रसृत केले आहेत.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-12-2022 at 16:45 IST
Next Story
आर्यन खानच्या निर्दोष मुक्ततेला हिंदू महासंघाकडून न्यायालयात आव्हान