बाजारपेठांत बेसुमार आवक; शेतकरी हवालदिल

Efforts to encroach on flamingo habitat for construction projects in Navi Mumbai
नवी मुंबईत फ्लेमिंगो अधिवासाचा गळा घोटला जातोय का? सरकारी यंत्रणाच ऱ्हासास कारणीभूत?
mumbai, charkop, Architect s Attempt to fraud , fungible carpet area in MHADA Housing, MHADA Housing Societies charkop, redevlopment of mhada socieities, mhada society charkop, chrkop news,
चारकोपमधील म्हाडा पुनर्विकासात फंजीबल चटईक्षेत्रफळाचा घोटाळा, अधिकाऱ्याच्या दक्षतेमुळे अनर्थ टळला!
With restrictions on the export of non basmati rice the demand from the domestic market also declined Pune news
आंबेमोहर, कोलमचे दर घसरले; जाणून घ्या, ग्राहकांना काय फायदा होणार ?
onion, farmers
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, जाणून घ्या केंद्र सरकारचा निर्णय

पुणे, नाशिक, ठाणे : राज्यातील सर्वच बाजार समित्यांच्या आवरात नवीन लाल कांद्याची बेसुमार आवक होत असून सोलापूर बाजार समितीच्या आवारात १२०० ट्रक एवढी उच्चांकी आवक झाली. नवीन लाल कांद्याची बाजारात आवक वाढल्याने किरकोळ तसेच घाऊक बाजारात कांदा दरात घट झाली आहे. चालना नसल्याने कांदा निर्यातही ठप्प आहे. कांदा निर्यातीला चालना द्यावी, अशी शेतकऱ्यांची आग्रही मागणी असून परदेशात कांद्याला चांगले दर मिळतील, याकडे लक्ष वेधण्यात आले आहे.

बाजारात नवीन लाल कांद्याची आवक वाढत असली, तरी केंद्र शासनाने कांदा निर्यातीसाठी कोणतेही ठोस धोरण जाहीर केलेले नाही. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, अशी परिस्थिती सध्या तरी दिसत नाही. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा उन्हाळ कांद्याची लागवड २५ ते ३० टक्क्यांनी वाढली आहे. उन्हाळ कांद्याची लागवड पुणे, नाशिक परिसरातील शेतकरी मोठय़ा प्रमाणावर करतात. डिसेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाचा फटका नवीन लाल कांद्याला बसला होता. त्यानंतर लागवड करण्यात आलेल्या दुसऱ्या टप्प्यातील नवीन लाल कांद्याची लागवड चांगली झाली असून प्रतवारीही चांगली असल्याचे श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील कांदा व्यापारी रितेश पोमण यांनी सांगितले. सध्या सर्व बाजार समित्यांच्या आवारात नवीन लाल कांद्याची मुबलक आवक होत आहे. गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात चांगल्या प्रतीच्या दहा किलो लाल कांद्याला ३५० रुपये असा दर मिळाला होता. किरकोळ बाजारात सध्या एक किलो कांद्याची विक्री प्रतवारीनुसार २० ते ३५ रुपये दराने केली जात आहे. बाजारपेठेत कांद्याची आवक मुबलक होत असून कांदा निर्यातीस चालना न दिल्यास शेतकऱ्यांना अपेक्षेएवढे दर मिळणार नसल्याची माहिती कांदा व्यापाऱ्यांनी दिली.

कांदा निर्यातीस चालना नसल्याने शेतकऱ्यांना अपेक्षेएवढे दरही मिळणार नाहीत. घाऊक बाजारात कांद्याची आवक मुबलक होत असून कांदा दरवाढीची शक्यता तूर्तास नसल्याचे कांदा व्यापारी रितेश पोमण यांनी सांगितले.

दरस्थिती.. घाऊक बाजारात चांगल्या प्रतीच्या दहा किलो लाल कांद्यास प्रतवारीनुसार २०० ते २३० रुपये असे दर मिळाले आहेत. मध्यम प्रतीच्या दहा किलो कांद्यांना १५० ते २०० रुपये असा दर मिळाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत लाल कांद्याला मिळणारे दर तुलनेने कमी आहेत.

यंदा स्वस्तच.. यंदाच्या हंगामात उन्हाळ कांद्याची लागवड २५ ते ३० टक्क्यांनी वाढली आहे. नवीन लाल कांद्याची मुबलक आवक होत आहे. कांदा लागवडीचा एकरी खर्च वाढलेला आहे. शेतमजुरी, फवारणी, वाहतूक असे खर्च विचारात घेतल्यास किमान लागवड खर्च निघायला हवा, अशी अपेक्षा आहे.

मुंबईत मुबलक..

नवी मुंबई बाजार समितीच्या आवारात नवीन लाल कांद्याची आवक वाढलेली आहे. दररोज १३० ते १४० गाडय़ांमधून कांदा विक्रीस पाठविला जात आहे. ठाणे, मुंबई उपनगरात सध्या किरकोळ बाजारात एक किलो कांद्याची विक्री प्रतवारीनुसार २० ते ३५ रुपये दराने केली जात आहे. मागणीच्या तुलनेत कांद्याची आवक मोठय़ा प्रमाणावर होत असल्याची माहिती नवी मुंबई बाजार समितीकडून देण्यात आली.

थोडी माहिती..  इराण, अफगाणिस्तान या देशांच्या तुलनेत देशातील विशेषत: नाशिक भागातील कांद्याची चव वेगळी आहे. अन्य देशांच्या तुलनेत आपला कांदा महाग आहे. श्रीलंका, आखाती देशांतून महाराष्ट्रातील कांद्याला मागणी आहे. कांदा निर्यातीतून देशाला परकीय चलन मिळते.

उन्हाळ कांद्याची लागवड मोठय़ा प्रमाणावर करण्यात आलेली आहे. कांदा दर स्थिर ठेवण्यासाठी कांदा निर्यातीला चालना देण्याची गरज आहे. इंधन दरवाढीमुळे शेतातून बंदरापर्यंत कांदा नेण्याचा खर्चही वाढलेला आहे. निर्यातीसाठी केंद्र शासनाकडून अनुदान देण्यात येत नाही. किमान देशांतर्गत वाहतुकीसाठी साहाय्य करायला हवे.

– चांगदेवराव होळकर, माजी उपाध्यक्ष, नाफेड (नॅशनल अ‍ॅग्रीकल्चर को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन)