पुणे म्हाडाच्या ४ हजार २२२ घरांसाठी ऑनलाइन अर्ज स्वीकृतीला प्रारंभ

पुणे म्हाडाच्या ४ हजार २२२ घरासांठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकृतीला प्रारंभ झाला आहे.

पुणे : पुणे म्हाडाच्या ४ हजार २२२ घरासांठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकृतीला प्रारंभ झाला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया सुरू झाली.  मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती कक्षात झालेल्या या कार्यक्रमावेळी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड, गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर, पुणे म्हाडाचे मुख्याधिकारी नितीन माने उपस्थित होते.  पुणे म्हाडाच्या माध्यमातून पुणे, सांगली, सोलापूर जिल्ह्यातील ४ हजार २२२  घरांसाठी जानेवारी २०२२ मध्ये सोडत निघणार आहे. ही योजना राज्यातल्या अनेक गरजूंचे, पुण्यासारख्या शहरात स्वस्त घर घेण्याचे स्वप्न पूर्ण करणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Online application houses pune mhada ysh

Next Story
आमदारांना पुढे करून मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ निर्णयांचे राष्ट्रवादीने श्रेय घेतले