निर्धारणाच्या ऑनलाइन प्रस्तावांसाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

शिक्षण संस्थांना  ३१ ऑक्टोबरपर्यंत प्रस्ताव सादर करता येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

पुणे : राज्यातील महाविद्यालयांना शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठीच्या शुल्करचना निर्धारणासाठी ऑनलाइन प्रस्ताव सादर करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. आता महाविद्यालयांना ३१ डिसेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करता येईल.

शुल्क नियामक प्राधिकरणाने परिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. राज्यातील विनाअनुदानित खासगी व्यावसायिक शिक्षण संस्थांना शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठीच्या शुल्करचना निर्धारणासाठीचे प्रस्ताव सादर करण्यास ३१ ऑक्टोबरची मुदत देण्यात आली होती.

मात्र करोनाच्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या अडचणीमुळे २०२१-२२च्या शुल्करचना निर्धारणासाठीच्या प्रस्ताव सादर करण्यासाठीही मुदतवाढ देण्यात आली होती. तसेच या पूर्वीच्या समितीचा कार्यकाळ मार्च २०२१ मध्ये कामकाजात अडचणी निर्माण झाल्या.

त्यानंतर शासनाने १८ जूनला नवीन समितीची नियुक्ती केली. मात्र २०१९-२० ते २०२१-२२ या कालावधीतील प्रलंबित असलेले प्रस्ताव अंतिम करण्याचे काम नव्या समितीकडून करण्यात येत आहे.

या पार्श्वभूमीवर २०२२-२३ या शैक्षणिक वर्षासाठीच्या शुल्करचना निर्धारणासाठीचे प्रस्ताव ऑनलाइन पद्धतीने सादर करण्यास मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आता शिक्षण संस्थांना  ३१ ऑक्टोबरपर्यंत प्रस्ताव सादर करता येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Online proposal for fixing college fee structure for the academic year 2022 23 extended

ताज्या बातम्या