‘थर्टीफस्ट’च्या पार्श्वभूमीवर शहरात अंमली पदार्थांची तस्करी वाढली असल्याचे दिसून येत आहे. पोलिसांना चकवा देण्यासाठी तस्करांकडून वेगवेगळ्या क्लुप्त्याही वापरण्यात येत आहेत. शहरात नुकत्याच पकडण्यात आलेल्या अंमली पदार्थांच्या तस्करांनी कुरिअरच्या वेष्टनातून चरस आणि गांजा शहरात विक्रीसाठी आणल्याचे उघडकीस आले आहे. त्याची विक्री ऑनलाइन पद्धतीने करण्यात येत असल्याची बाबही समोर आली आली. पोलिसांनी या प्रकरणी दोघांना बेड्या ठोकून त्यांच्याकडून सव्वातीन लाखांचा ऐवज जप्त केला आहे.

हेही वाचा >>>‘स्लीप डिस्क’ वरील शस्त्रक्रियेमुळे रुग्णाचा मणके विकार टाळण्यात यश; लखनौ येथील महिलेवर पुण्यात यशस्वी शस्त्रक्रिया

bombay share market, sesex, nifty
भू-राजकीय तणाव वाढण्याच्या भीतीने ‘सेन्सेक्स’ची ४५६ अंश गाळण
Nigerian citizen, Arrested in Nalasopara, Drugs Worth 57 Lakhs, cocaine, mephedrone, drugs in nalasopara, crime in nalasopara, marathi news, crime news,
नालासोपार्‍यात ५७ लाखांचे अमली पदार्थ जप्त
winners of patra chawl
पत्राचाळीतील ३०६ विजेत्यांची घरांची प्रतीक्षा संपेना, भोगवटा प्रमाणपत्र न मिळाल्याने ताबा प्रक्रियेस विलंब
Sensex jump over 500 point to hit
सेन्सेक्सची पाच शतकी दौड

हर्षद दत्तात्रय इंगळे (वय २१, रा. मुळशी) व भागवत शेषनारायण सुरनर (वय २०, रा. बावधन) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहरात अमली पदार्थ तस्करी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. थर्टीफस्टनिमित्त शहरातील तस्कर सक्रीय झाल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर अमली पदार्थ विरोधी पथकाकडून या तस्कारांवर लक्ष केंद्रीत केले जात आहे. सहाय्यक आयुक्त गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक सिंहगड रस्ता भागात गस्त घालत होते. दरम्यान, पथकाला दोघे पुणे-बेंगलोर महामार्गावरील सनसिटी बायपास येथे ऑनलाइन गांजा व चरस विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली