पिंपरी: पिंपरी पालिकेच्या माजी नगरसेविका आणि भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्षा उमा खापरे यांना भाजपने विधान परिषदेची उमेदवारी दिली आहे. पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या पंकजा मुंडे यांना उमेदवारी नाकारून खापरे यांना संधी देण्यात आल्याची भाजप वतुर्ळात चर्चा आहे. मात्र, खापरे यांनीच ती शक्यता फेटाळून लावली आहे.

विधान परिषदेच्या १० जागांसाठी २० जूनला निवडणूक होणार आहे. त्यासाठी बुधवारी भाजपने पाच जणांची उमेदवारी जाहीर केली. त्यात खापरे यांचासमावेश झाल्याने पिंपरी-चिंचवडमध्येतो चर्चेचा विषय ठरला. चिंचवडच्या रहिवासी असलेल्या आणि दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या कट्टरसमर्थक अशी राजकारणातील ओळख असलेल्या उमा खापरे पिंपरी पालिकेवर दोन वेळा निवडून आल्या होत्या. तेव्हा एका वर्षासाठी पालिकेतील विरोधी पक्षनेत्या म्हणूनही त्यांनी कामकेले आहे. भाजपच्या संघटनात्मक पातळीवर विविध पदांवर काम केल्यानंतर त्यांच्याकडे गेल्या वर्षी महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली होती. विधान परिषदेसाठी त्यांचे नाव चर्चेतही नव्हते. बुधवारी सकाळी प्रदेशाध्यक्षचंद्रकांतपाटील यांनी विधानपरिषदेची उमेदवारी मिळाल्याची माहिती कळवली. तेव्हा खापरे यांनाही आश्चर्याचा धक्का बसला. महिला प्रदेशाध्यक्षा पदावर असलेल्या खापरे याओबीसी समाजातील आहे. त्यामुळेच पंकजा मुंडे यांचापत्ता कापण्यासाठी खापरे यांचे नाव पुढे करण्यात आल्याचे भाजप वतुर्ळात मानले जाते. तथापि, उघडपणे याविषयी कोणीही भाष्यकरताना दिसत नाही. शहरातील मुंडे समर्थकांनीही अशी शक्यता फेटाळून लावली आहे. पंकजा यांच्या उमेदवारीसाठी आम्ही भरपूरप्रयत्न केले, अशी सारवासारवा चंद्रकांतपाटील यांनी मुंबईत पत्रकारांशी बोलताना केली आहे. दरम्यान, खापरे यांची विधान परिषदेवर निवड झाल्यास भाजपला शहरात तिसरा आमदार मिळणार आहे.

revenue minister radhakrishna vikhe sent businessman to me for not to nominate nilesh lanke says sharad pawar
निलेश लंके यांना उमेदवारी देऊ नये म्हणून महसूलमंत्र्यांनी उद्योगपतीला माझ्याकडे पाठवले! शरद पवार यांचा नगरच्या सभेत खळबळजनक दावा
ajit pawar ncp s mla, dilip mohite, collector office, amol kolhe, nomination form, shirur lok sabha constituency, lok sabha 2024, election 2024, shirur news, politics news, pune news,
खेडचे आमदार दिलीप मोहिते यांच्या ‘टायमिंग’मुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Chandrashekhar Bawankule
औषधी संचावर पंतप्रधानांचा फोटो का नाही, चंद्रशेखर बावनकुळेंचा पुण्यातील पदाधिकाऱ्यांना प्रश्न
pratibha dhanorkar
काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकरांकडे ३९ कोटींचे ‘हातउसने’!

‘पंकजाताईंनी माझी शिफारस केली असेल’

पक्षाने उमेदवारी दिल्याचे समजल्यानंतर खूपच आश्चर्य वाटले. कारण, विधान परिषदेच्या उमेदवारीची मागणी केली नव्हती. एखाद्या छोट्या कार्यकर्त्याला अशाप्रकारचा न्याय फक्त भाजपमध्येच मिळू शकतो. उमेदवारीबद्दल सर्व पक्षांचे नेत्यांचे आभार मानते. पंकजा मुंडे यांची उमेदवारी कापून मला संधी देण्यात आली, असे मी बिलकूल मानत नाही. इतर नेत्यांप्रमाणेच पंकजाताईंनी माझ्या नावाची शिफारस केली असेल, अशी प्रतिक्रियाउमा खापरे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.