जुन्नर : जुन्नर तालुक्यातील ओतूर येथील एका विद्यालयातील दहावीच्या परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यावर कोयत्याने वार करण्यात आल्याची घटना बुधवारी घडली. या प्रकरणी पाच अल्पवयीन मुलांविरूद्ध ओतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओतूर येथील संबंधित विद्यार्थी दहावीची परीक्षा देण्यासाठी केंद्रावर आला होता. यावेळी पूर्ववैमनस्यातून पाच अल्पवयीन मुलांनी विद्यार्थ्याला मारहाण केली.
त्यापैकी एका अल्पवयीन मुलाने विद्यार्थ्याच्या डाव्या हातावर वार केला. त्यानंतर पाचही मुलांना ताब्यात घेण्यात आले. जखमी विद्यार्थ्यावर उपचार करण्यात आले. त्यानंतर तो आई-वडिलांबराेबर पोलीस ठाण्यात आला. त्यानंतर पाच अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
