scorecardresearch

दरवर्षी सव्वा लाख तरुण संघाशी जोडण्याचे काम; पश्चिम महाराष्ट्र प्रांतात शाखांच्या संख्येत वाढ

पश्चिम महाराष्ट्र प्रांतामध्ये २४७ ठिकाणी दैनंदिन स्वरूपात ६०० शाखा भरतात.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (प्रातिनिधिक छायाचित्र)

पुणे : विविध क्षेत्रांतील सेवा कार्याच्या प्रभावामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कामाविषयी तरुणांमध्ये आकर्षण वाढत आहे. ‘जॉईन आरएसएस’च्या माध्यमातून दरवर्षी सव्वा लाख युवक संघाशी जोडले जात आहेत. संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांतामध्ये शाखांच्या संख्येतही वाढ झाल्याची माहिती येथे आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली.

अहमदाबाद येथे नुकत्याच झालेल्या संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेतील कामकाजाची माहिती संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघचालक नानासाहेब जाधव आणि प्रांत कार्यवाह डॉ. प्रवीण दबडघाव यांनी शुक्रवारी दिली. संघाचे महानगर कार्यवाह महेश करपे या वेळी उपस्थित होते.

करोना प्रादुर्भावाच्या काळात संघ स्वयंसेवकांनी उल्लेखनीय कार्य केले. प्रादुर्भाव ओसरल्यानंतर संघाच्या शाखांचे काम पूर्ववत सुरू झाले असून शाखांमध्ये विद्यार्थी आणि युवा व्यावसायिक यांचा मोठय़ा प्रमाणावर सहभाग आहे. विविध १७ प्रकारची सेवा कार्ये, सामाजिक सद्भाव, पर्यावरण, कुटुंब प्रबोधन, प्रचार, धर्मजागरण, शारीरिक विभाग अशा विविध क्षेत्रात संघाचे काम सुरू असल्याचे जाधव यांनी सांगितले.

पश्चिम महाराष्ट्र प्रांतामध्ये २४७ ठिकाणी दैनंदिन स्वरूपात ६०० शाखा भरतात. तर, आठवडय़ातून एकदा याप्रमाणे ५५० ठिकाणी साप्ताहिक मिलन सुरू आहेत. शाखांच्या एकूण संख्येत गेल्या वर्षीच्या तुलनेत ६० टक्क्यांनी वाढ झाली असल्याचे दबडघाव यांनी सांगितले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Over 1 lakh 25 thousand youth join rashtriya swayamsevak sangh zws

ताज्या बातम्या